नवी दिल्ली, 21 मार्च: अभिनेत्री सोनम कपूर(Sonam kapoor ) गरोदर असून लवकरच आई होणार आहे. खुद्द अभिनेत्रीने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. यासोबतच अभिनेत्रीने बेबी बंपसोबतचे फोटोही शेअर केले आहेत. यावेळी सोनमसोबत तिचा पती आनंद आहुजाही दिसत आहे.
View this post on Instagram
बेबी बंपसोबतचे फोटो शेअर करत सोनमने खास कॅप्शनदेखील दिली आहे. चार हात, आमच्याकडून जितके होईल तितकी सोय केली जाईल. तुझ्यासोबत दोन ह्रदय धडकतील. एक कुटुंब असे आहे जे तुला नेहमी पाठिंबा देईल. मी तुझी वाट पाहत आहे. अशी कॅप्शन सोनमने दिली आहे.
सोनमने नेहमीप्रमाणे हटके स्टाईल फोटोशुट केले आहे. या फोटोशुटमध्ये सोनमचा नेहमीप्रमाणे बोल्ड अवतार पाहण्यास मिळत आहे. बी टाऊनमध्ये तिच्या या हटके फोटोशुटचीदेखील चर्चा रंगली आहे.
गुड न्यूज शेअर केल्यानंतर चाहत्यांकडून तिच्या वर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये सगळ्यात पहिली कमेंट कुणाची असेल तर ती तिची जवळची मैत्रीण बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरची आहे तिला शेअर केल्याबद्दल शुभेच्छा दिले आहेत. शिवाय लवकरच आपली मुलं एकत्र येतील. अशा देखील शुभेच्छा दिलेले आहेत.
सोनमने 8 मे 2018 मध्ये तिचा प्रियकर आनंद अहुजाशी लग्न केले. याच दिवशी या दोघांनी जंगी रिसेप्शनही ठेवले होते. मुंबईच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये पार पडलेल्या या रिसेप्शमध्ये अनेक दिग्गजांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. सोनम लग्नानंतर आनंदसोबत परदेशात राहते. अधून-मधून ती मुंबईत येते असते. मात्र सोनम नेहमीच तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Sonam Kapoor