'मिस्टर इंडिया'च्या रिमेकवरून भडकली सोनम कपूर, त्यानंतर तिने काय केलं ते पाहा

'मिस्टर इंडिया'च्या रिमेकवरून भडकली सोनम कपूर, त्यानंतर तिने काय केलं ते पाहा

बॉलीवुड (Bollywood) मधील प्रसिद्ध सिनेमा ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India) चित्रपट रसिकांसाठी आवडीचा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या रिमेकबाबत बी-टाऊनमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र मुख्य चित्रपटातील कलाकारांना रिमेकबाबत माहितच नसल्याची बाब समोर येत आहे.

  • Share this:

मुंबई, 22 फेब्रुवारी : बॉलीवुड (Bollywood) मधील प्रसिद्ध सिनेमा ‘मिस्टर इंडिया’ (Mr. India) चित्रपट रसिकांसाठी आवडीचा सिनेमा आहे. या चित्रपटाच्या रिमेकबाबत बी-टाऊनमध्ये चर्चा सुरू आहेत. मात्र या रिमेकबाबत एव नवं सत्य समोर येत आहे. मुख्य चित्रपटातील कलाकारांना रिमेकबाबत माहितच नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. दिग्दर्शक अली अब्बास जफरने (Ali Abbas Zafar) या चित्रपटाच्या रिमेकबाबत एक ट्वीट केलं होतं. ज्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री सोनम कपूर अहूजाने याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 1987 मध्ये मिस्टर इंडिया प्रदर्शित झाला होता. यामध्ये अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या मुख्य भूमिका होत्या.

(हेही वाचा-ग्लॅमरस खासदार मिमी चक्रवर्तींचा पारंपरिक लूक, महाशिवरात्रीचे फोटो केले शेअर)

सोनमने ट्वीट करत तिची नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये सोनमने असं म्हटलं आहे की, ‘मला अनेकांनी ‘मिस्टर इंडिया’च्या रिमेकबाबत विचारलं. खरं सांगायचं तर मला याबाबत कोणतीच कल्पना नाही आहे. एवढच काय माझ्या वडिलांनाही याबाबत काही कल्पना नाही आहे. अली अब्बासने जेव्हा ट्विटरवरून याबाबत माहिती दिली तेव्हा आम्हाला कळलं. मला ही गोष्ट गुलदस्त्यात ठेवल्यामुळे मला वाईट वाटलं आहे. हा चित्रपट बनवण्यामध्ये ज्या दोन व्यक्तींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे, माझे वडील आणि शेखर अंकल, या दोघांनाही याबाबत माहित नसणं हे अत्यंत अनादरयुक्त आहे. हे दु:खद आहे कारण हा चित्रपट मोठ्या कष्टाने आणि मनापासून बनवण्यात आला होता आणि माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळचा असा हा सिनेमा आहे. बॉक्स ऑफिसवर सिनेमा चालण्या एवढच महत्त्वाचं आहे की एखाद्याच्या कामाचा आदर करणं.’

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी अशा चर्चांना देखील उधाण आलं होतं की, यामध्ये अनिल कपूर यांची भूमिका रणवीस सिंह करणार असून मोगँबोच्या भूमिकेत चक्क किंग खान शाहरूख दिसेल. दिग्दर्शक अली अब्बास जफरने (Ali Abbas Zafar) या चित्रपटाच्या रिमेकबाबत एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तो म्हणाला होता की, ‘ही घोषणा करताना मी खूप उत्साहित आहे. लवकरच मी आयकॉनिक चित्रपट ‘मिस्टर इंडिया’चा रिमेक बनवणार आहे. मात्र यामध्ये कोण अभिनय करणार हे अद्याप ठरलेलं नाही’.

First published: February 22, 2020, 8:00 PM IST
Tags:

ताज्या बातम्या