सोशल मीडियावर अनिल कपूरचा हा फोटो का होतोय व्हायरल? सोनम कपूर चिडून म्हणाली...

सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात असून त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 19, 2019 05:02 PM IST

सोशल मीडियावर अनिल कपूरचा हा फोटो का होतोय व्हायरल? सोनम कपूर चिडून म्हणाली...

मुंबई, 19 ऑगस्ट : काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधून 370 हटवण्यात आलं. त्यानंतर अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या. देशवासीय सरकारच्या या निर्णयावर खूश आहेत तर दुसरीकडे पाकिस्तानकडून भारताच्या या निर्णयावर मात्र आगपखड होताना दिसते. इतकंच नाही तर पाकिस्ताननं बॉलिवूड सिनेमांना त्यांच्या देशात बंदी घातली आहे. मात्र बॉलिवूड स्टार्सनी सरकारच्या या निर्णयावर सकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. कंगना रनौत, दीया मिर्जा, पूजा बेदी, जायरा वसीम, अनुपम खेर, रवीना टंडन, संजय सूरी यांसारख्या कलाकारांनी भारत सरकारच्या या निर्णयाचं कौतुक केलं आहे.

बॉलिवूड कलाकारांकडू भारताच्या या निर्णयाचं कौतुक होत असतानाच अभिनेत्री सोनम कपूरनं जम्मू आणि काश्मीर निर्णयावर आपलं मत मांडलं आहे. याविषयी बोलताना सोनम म्हणाली, मला या प्रकरणाविषयी अद्याप पूर्ण काहीही माहिती नाही. कारण मीडियामध्ये याविषयी बरंच काही लिहिलं जात आहे. काश्मीरमध्ये अशाप्रकारच्या घटना घडत असल्यानं मी त्या ठिकाणी जाऊ शकत नाही आहे.

Bhool Bhulaiyaa 2 First Look : पोस्टरवरून या हिरोला ओळखणंही झालं कठीण!

सोनम पुढे म्हणली, मी अर्धी सिंधी आणि अर्धी पेशावर आहे. सध्याची परिस्थिती पाहून मला खूप दुःख होतं. मी देशभक्त आहे आणि मला वाटत मी शांत राहायला हवं. हा वेळही  निघून जाईल. एक कलाकार म्हणून मला वाटतं की, मी प्रत्येक वेळी स्वतःला रिप्रेझेंट करावं. तुम्हाला  नेहमी असं वाटतं की, तुमचं काम सर्वत्र दाखवलं जावं. माझा ‘निरजा’ हा सिनेमा पाकिस्तानात दाखवण्यात आला नव्हता. खरं तर हा सिनेमा एका सत्य कथेवर आधारित होता. ज्यात ते विमान कराचीमध्ये लॅन्ड होतं. मात्र या सिनेमात पाकिस्तान बद्दल कोणत्याही नकारात्मक गोष्टी दाखवण्यात आलेल्या नाही. त्यामुळे हा सिनेमा पाकिस्तानात दाखवला गेला नसल्यानं मी खूप दुःखी झाले होते. माझे अनेक मित्र सुद्धा पाकिस्तानी आहेत. तसेच तिथे चाहते सुद्धा खूप आहेत.

Loading...

गे म्हणणाऱ्या ट्रोलरवर भडकला करण जोहर, अशी केली बोलती बंद

मात्र सोनमच्या या प्रतिक्रियेनंतर सोशल मीडियावर हिंदूवादी लोकांनी तिला ट्रोल करायला सुरुवात केली. सध्या सोशल मीडियावर अनिल कपूर यांचा एक फोटो शेअर केला जात असून त्यावर अनेक नकारात्मक प्रतिक्रिया येत आहे. अनेकांनी सोनमच्या देशभक्तीवरही प्रश्न उपस्थित केले आहेत. हे पाहिल्यावर सोनमनं पुन्हा एकदा एक ट्वीट करून याबाबतचं स्पष्टीकरण दिलं आहे.

Mission Mangal टीमचा अंतरिक्ष ते अंताक्षरी पर्यंतचा प्रवास, पाहा UNSEEN VIDEO

सोनमनं तिच्या ट्विटर अकाउंटवर नुकतीच एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये सोनमनं लिहिलं, ‘कृपया तुम्ही सर्वांनी शांतता राखा... आणि तुमचं आयुष्य जगा. कोणच्याही कोणत्याही गोष्टीवर ट्वीट करून एखाद्या व्यक्तीला ट्रोल केल्यानं प्रतिक्रिया देणाऱ्या व्यक्तीला या सगळ्याचा काहीही फरक पडत नाही. या उलट तुम्हालाचा याचा त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच पाहा तुम्ही कोण आहात आणि तुमच काम करा.’

============================================================================

Zomato महिला कर्मचाऱ्याची पोलिसांवर दादागिरी, शिवीगाळ केल्याचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 19, 2019 05:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...