मी आडनाव काय ठेवू हे तुम्ही कोण सांगणारे ?,सोनमने सुनावलं

मी आडनाव काय ठेवू हे तुम्ही कोण सांगणारे ?,सोनमने सुनावलं

"मला माझं नाव बदलायचं की नाही हे मी ठरवणार. आनंदनेही आपलं नाव बदलं पण त्यावर कुणी काही बोललं नाही"

  • Share this:

17 मे : लग्न झाल्यानंतर मुली आपलं आडनाव बदलतात. अभिनेत्री सोनम कपूरनेही आपलं आडनाव बदललं. सोनमने आपलं नाव आता सोनम कपूर आहुजा असं केलंय. पण यामुळे सोनमवर फेमिनिझमचा आरोप झाला. यावर तिने टिकाकारांना चोख प्रत्युतर दिले आहे.

लोकप्रिय लेखिका आणि फेमिनिस्ट तसलीमा नसरीन यांनी यावर टि्वट केलं होतं. सोनम माॅर्डन कपडे घालते, माॅर्डन असल्याचा दाखवते पण खऱ्या आयुष्यात ही लोकं माॅर्डन राहत नाही. ते अजूनही जुन्या रुढी परंपरा आणि अंधश्रद्धेलाच खतपाणी घालतात अशी टीका नसरीन यांनी केली होती.

'इंडियन एक्स्प्रेस'शी बोलताना सोनमने यावर खुलासा केलाय. कुणीही आपल्या खाजगी आयुष्यात काय करावं आणि काय करू नये हे कुणीही ठरवू शकत नाही.

मी नेहमी सांगते की मी एक फेमिनिस्ट आहे. मला माझं नाव बदलायचं की नाही हे मी ठरवणार. आनंदनेही आपलं नाव बदलं पण त्यावर कुणी काही बोललं नाही. तुम्ही आनंदलाही विचारलं पाहिजे त्याने नाव का बदलं ? असा उपरोधी टोलाही सोनमने लगावला.

याशिवाय फेमिनिझम हे समान अधिकारावर आधारित आहे. फेमिनिझम तुम्हाला पूर्ण मोकळीक देते की तुम्ही काय केलं पाहिजे. मी आता आनंदच्या कुटुंबाची एक सदस्य झाली आहे. आता यावर चर्चा करणे जरा कठिण आहे. पण माझ्या निर्णयावर मी ठाम आहे, पण हे फेमिनिझम नाहीये असंही सोनमने ठणकावून सांगितलं.

First published: May 17, 2018, 7:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading