सोनम कपूरनं ट्विटरला ठोकला रामराम कारण...

सोनम कपूर तर ट्विटरवर अनेक गोष्टी शेअर करायची. पण आता फॅन्सना हे सगळं मिस करावं लागणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Oct 6, 2018 04:19 PM IST

सोनम कपूरनं ट्विटरला ठोकला रामराम कारण...

मुंबई, 6 आॅक्टोबर : सेलिब्रिटीज नेहमीच सोशल मीडियावर कार्यरत असतात. विशेषत: ट्विटर वापरण्याकडे यांचा जास्त कल असतो. सोनम कपूर तर ट्विटरवर अनेक गोष्टी शेअर करायची. पण आता फॅन्सना हे सगळं मिस करावं लागणार आहे.

कारण सोनमनं ट्विटरला रामराम ठोकलाय. 5 आॅक्टोबरला ट्विट करून सोनमनं लिहिलं, इथे बऱ्याच नकारात्मक गोष्टी होतायत. म्हणून मी थोडा वेळ ट्विटरपासून दूर राहणार आहे. सोनम इन्स्ट्राग्रामवर फॅन्सना भेटणार आहे.

Loading...

परवाच तिनं ट्विट केलं होतं, मुंबईतल्या प्रदूषणावर टीका करण्यापेक्षा लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरावा. यावर तिला खूप ट्रोल करण्यात आलं. त्यामुळेच कदाचित ती निराश झाली असावी.

सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा नेहमीच कुठे ना कुठे भटकंती करत असतात. दोघंही नेहमीच खूश दिसतात. मध्यंतरी, 'वूट ओरिजिनल फीट अप विथ द स्टार्स' या शोमध्ये सोनम कपूरची मुलाखत झाली.या शोमध्ये स्टायलिस्ट सेलिब्रिटी अनायाता श्रॉफ अदजानियासोबत बेडवर गप्पा करताना दिसली.

यावेळी सोनम कपूरनं खूप चांगले सल्ले दिले. ती म्हणाली, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा.तेच परिधान करा जे तुम्हाला आरामदायी बनवते. आरोग्यपूर्ण आहार घ्या. लोक आपल्याबद्दल काय मत व्यक्त करतात त्याने तुम्ही आत्मविश्वास गमावू नका.

लग्न झाल्यानंतर मुली आपलं आडनाव बदलतात. अभिनेत्री सोनम कपूरनेही आपलं आडनाव बदललं. सोनमने आपलं नाव आता सोनम कपूर आहुजा असं केलंय. पण यामुळे सोनमवर फेमिनिझमचा आरोप झाला. यावर तिने टीकाकारांना चोख प्रत्युतर दिले आहे.

PHOTOS : 'सुईधागा'च्या सेलिब्रेशनला अनुष्का-वरुणचा जलवा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 6, 2018 04:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...