मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /OMG! लंडनमध्ये सोनम स्वयंपाकापासून ते झाडू मारण्यापर्यंत करते सगळी काम; स्वतःच केला खुलासा

OMG! लंडनमध्ये सोनम स्वयंपाकापासून ते झाडू मारण्यापर्यंत करते सगळी काम; स्वतःच केला खुलासा

“मला इथलं स्वातंत्र्य पसंत आहे. मी माझी सगळी कामं स्वतःच करते..." आपल्या सासरी सोनम कशी राहते याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.

“मला इथलं स्वातंत्र्य पसंत आहे. मी माझी सगळी कामं स्वतःच करते..." आपल्या सासरी सोनम कशी राहते याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.

“मला इथलं स्वातंत्र्य पसंत आहे. मी माझी सगळी कामं स्वतःच करते..." आपल्या सासरी सोनम कशी राहते याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.

मुंबई 6 जुलै: अभिनेत्री सोनम कपूर (Sonam Kapoor) सध्या फारच कमी चित्रपटांत दिसत आहे. विवाहानंतर सोनमने जास्तीत जास्त वेळ पतीसोबत आणि कुटुंबासोबतच घालवणं पसंत केलं आहे. सोनमने 2018 साली उद्योजक आनंद अहुजा (Anand Ahuja) याच्याशी विवाह केला होता. त्यानंतर ती आता त्याच्यासोबत लंडनमध्ये (London) राहत आहे. तेव्हा आपल्या सासरी सोनम कशी राहते याचा खुलासा तिने स्वतःच केला आहे.

वोग (Vogue) या फॅशन मॅगझिनशी बोलताना सोनम म्हणाली, “मला इथलं स्वातंत्र्य पसंत आहे. मी माझी सगळी कामं स्वतःच करते. पोळ्या बनवते. रूम ची साफसफाई करते, याशिवाय घरातील सामानाची खरेदी देखील मी स्वतःच करते.”

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

याशिवाय पती आनंद आहुजा सोबत कसा वेळ घालवतो यावरही सोनम म्हणाली, “आम्ही काम संपल्यावर एकमेकांशी खूप गप्पा मारतो. रात्री जेव्हा टीव्ही वरील कार्यक्रम पाहण्याची वेळ येते तेव्हा आमचं अजिबात पटत नाही. आनंद ला फुटबॉल मॅच पहायची असते तर मला ‘क्वीन्स ऑफ गॅम्बित’ पहायचं असतं.”

View this post on Instagram

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

सोनम लंडन मध्ये राहत असली तरीही कामानिमित्त आणि आपल्या कुटुंबियांना भेटायला ती भारतात येत असते. अनेकदा ती एअरपोर्ट वर स्पॉट होते. याविषयी बोलताना पुढे ती म्हणाली, “मला भारताची फार आठवण येते. मी माझ्या कुटुंबियांना, मित्रमैत्रीणींना खूप मिस करते. मला आनंद आहे की मी माझ्या घरात आहे माझ्यासोबत आनंद आहे.”

वाढदिवशी रणवीर सिंगची चाहत्यांना गोड भेट; नव्या भूमिकेसाठी सज्ज

सोनम आणि आनंदने अनेक वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर 2018 साली विवाह केला होता. तिने असंही म्हटलं होतं की, “आम्ही एकमेकांसोबत इतक्या मजबूत नात्यात होतो की आम्हाला फरक नाही पडत याला कोणतं नाव दिलं पाहिजे. पण कुटुंबियांसाठी आम्ही विवाह केला.”

First published:
top videos

    Tags: Bollywood, Bollywood actress, Bollywood News, Entertainment, Sonam Kapoor