सोनम कपूरच्या पर्सची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

सोनम कपूरच्या पर्सची किंमत कळली तर तुम्हाला धक्काच बसेल

सोनमनं एकदा पिंक रंगाचा पोशाख घातला होता. पण त्या पोशाखापेक्षा तिच्या हातात असलेल्या पर्सकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. लुईस विट्टन ब्रँडची ती पर्स होती. त्या पर्सची किंमत पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

  • Share this:

मुंबई, 17 डिसेंबर : अभिनेत्री सोनम कपूर नेहमीच आपल्या स्टाइलसाठी प्रसिद्ध अाहे. तिच्या स्टाइलला अनेक जण फाॅलो करत असतात. नेहमीच ती तिच्या पोशाखाबद्दल जागरुक असते.

सोनमनं एकदा पिंक रंगाचा पोशाख घातला होता. पण त्या पोशाखापेक्षा तिच्या हातात असलेल्या पर्सकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. लुईस विट्टन ब्रँडची ती पर्स होती. त्या पर्सची किंमत पाहून सगळ्यांनाच धक्का बसला.

या पर्सची पाँड्समध्ये किंमत आहे 2990, म्हणजे 2 लाख 43 हजार रुपये.

सोनमचा खूप दिवसांत कुठला सिनेमा रिलीज झाला नाही. पण लवकरच ती दक्षिणेकडचा सुपरस्टार दलकीर सलमासोबत  द जोया फॅक्टर सिनेमात दिसणार आहे.

सोनम आणि तिचा पती आनंद आहुजा नेहमीच कुठे ना कुठे भटकंती करत असतात. दोघंही नेहमीच खूश दिसतात. मध्यंतरी, 'वूट ओरिजिनल फीट अप विथ द स्टार्स' या शोमध्ये सोनम कपूरची मुलाखत झाली.या शोमध्ये स्टायलिस्ट सेलिब्रिटी अनायाता श्रॉफ अदजानियासोबत बेडवर गप्पा करताना दिसली.

यावेळी सोनम कपूरनं खूप चांगले सल्ले दिले. ती म्हणाली, स्वतःवर प्रेम करा, स्वतःसाठी जगा.तेच परिधान करा जे तुम्हाला आरामदायी बनवते. आरोग्यपूर्ण आहार घ्या. लोक आपल्याबद्दल काय मत व्यक्त करतात त्याने तुम्ही आत्मविश्वास गमावू नका.

लग्न झाल्यानंतर मुली आपलं आडनाव बदलतात. अभिनेत्री सोनम कपूरनेही आपलं आडनाव बदललं. सोनमने आपलं नाव आता सोनम कपूर आहुजा असं केलंय. पण यामुळे सोनमवर फेमिनिझमचा आरोप झाला. यावर तिने टीकाकारांना चोख प्रत्युतर दिलं.

First published: December 17, 2018, 2:59 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading