बाप आणि मुलीचं नात उलगडण्यासाठी सोनम वडिलांसोबत झळकणार सिल्व्हर स्क्रिनवर

बाप आणि मुलीचं नात उलगडण्यासाठी सोनम वडिलांसोबत झळकणार सिल्व्हर स्क्रिनवर

अभिनेत्री सोनम कपूरचे वडिल अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे.

  • Share this:

18 फेब्रुवारी : अभिनेत्री सोनम कपूरचे वडिल अनिल कपूर यांच्यासोबत काम करण्याचं स्वप्न आता पूर्ण झालं आहे. सोनमनं तिच्या ट्विटर अकाऊंटवरुन ही आनंदाची बातमी तिच्या फॅन्सना दिली आहे. सोनम लवकरच अनिल कपूरसोबत एकत्र काम करताना दिसणारे आहे. त्यामुळे सोनम आणि अनिल कपूर यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.

या सिनेमाच्या शूटिंगला सोनमने आता सुरुवात देखील केली आहे. सोनमने सोशल मीडियावर वडिलांसोबत फोटो शेअर करत मी या सिनेमासाठी फारच उत्सुक असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर वडिलांच्या टीमसोबत काम करत असताना मला घराच्यासारखं वाटतं आहे. असंही सोनम म्हणाली.

या सिनेमात सोनम कपूर आणि अनिल कपूरसोबतच राजकुमार राव, जूही चावलाही झळकणार आहे. बाप आणि मुलीच्या नात्यावर हा सिनेमा बनवण्यात येणार आहे. त्यामुळे बाप-बेटीचं खरं नात सिनेमातून चाहत्यांना आनंदता येणार आहे.

First published: February 18, 2018, 8:43 AM IST

ताज्या बातम्या