मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Sonali patil: बिग बॉस फेम सोनाली पाटील दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत करणार एंट्री

Sonali patil: बिग बॉस फेम सोनाली पाटील दिसणार नव्या भूमिकेत; 'या' मालिकेत करणार एंट्री

Sonali patil

Sonali patil

सोनालीने तिच्या सुंदरतेने आणि अभिनयाने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मध्यंतरी तिने मालिकाविश्वातून ब्रेक घेतला होता. आता पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकायला ती सज्ज झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Nishigandha Kshirsagar

मुंबई,  27 सप्टेंबर : बिग बॉस हा रियालिटी शो म्हटलं की, वाद-विवाद, धमाल मस्ती, प्रेम, फ्रेंडशीप आलंच. बिग बॉस शोचा मोठा चाहता वर्ग असून अनेकजण या शोला फॉलो करतात. अशातच 'बिग बॉस मराठी' चा तिसरा सीजन प्रचंड गाजलेला पहायला मिळाला. या शोमधील कलकारही चांगलेच चर्चेत राहिले. अद्यापही त्यांची लोकप्रिया वाढत असून ते सतत चर्चचा विषय ठरत असतात. बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वामधील स्पर्धक अभिनेत्री सोनाली पाटील देखील कायम चर्चेत असते. तिच्या सुंदरतेने तिने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे. मध्यंतरी तिने ब्रेक घेतला होता. आता पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकायला ती सज्ज झाली आहे.

सोनाली पाटील लवकरच मराठी मालिकेमध्ये दिसणार आहे. तीनं तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांना दिली आहे. सोनाली लवकरच सन मराठीवरील 'गजानन महाराज' या मालिकेत नव्या भूमिकेत दिसणार आहे. या भूमिकेसाठी ती स्वतःला भाग्यवान समजते.  तिने सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटलंय कि, 'वेळ दुपारची अचानक सुवर्णा ताई चा कॉल आला "काय करतेयस ग....?" सन मराठी सीरियल 'संत गजानन शेगावीचा' च्या सीरियल मधे एक ट्रॅक येतोय one day आहे.... आणि कॅरेक्टर आहे "सीता".  हे ऐकल्यानंतर कोण नाही म्हणायची हिंमत करेल इतकी सुंदर सिरीयल आणि त्या सिरीयल मध्ये आपण असं एक कॅरेक्टर करणार आहोत जे आपल्यासाठी आदर्श आहे...यांना आपण पुजतो''

तिने पुढे म्हटलंय कि, ''मला वाटतं मला वाटतं कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री साठी हे स्वप्न असेल की आपण "सीता" साकारणं आणि सीता करायला मिळणं हे मी माझे भाग्यच समजते...... त्यामुळे या एक दिवस असो अथवा एक तास या सिरीयल ला नाही हा शब्द म्हणण्याचा प्रश्नच नव्हता गजानन महाराजांची सेवा म्हणून हे तुमच्यासाठी माझ्याकडून काहीतरी वेगळा प्रयत्न प्रेम आणि आशीर्वाद असू''

हेही वाचा - Bigg Boss Marathi : बिचुकलेची अटक ते सोनालीवर विशालचे गंभीर आरोप; 'हे' आहेत बिग बॉसमधील बहुचर्चित वाद

तिच्या या पोस्टमुळे तिचे चाहते भलते खुश झालेत. या पोस्टवर त्यांनी सोनालीवर अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. बऱ्याच काळानंतर सोनाली आता नवीन भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिला या मालिकेत पाहण्यासाठी तिचे चाहते प्रचंड खुश झाले आहेत.

दरम्यान, बिग बॉस शोमध्ये विशाल आणि सोनालीची हटके केमिस्ट्री आणि त्यांनतर त्यांच्यात झालेला वादसुद्धा प्रचंड चर्चेत आला होता. बिग बॉसमुळे दोघांचाही मोठा चाहतावर्ग निर्माण झाला होता. बिग बॉसमधून बाहेर आल्यानंतरही सोनाली नेहचीच चर्चेत असते. सोशल मीडियावर नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. चाहतेही तिच्या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया देताना दिसतात. आता बिग बॉसचा नवा सिझन लवकरच सुरु होणार आहे.

दरम्यान, 'बिग बॉस मराठी' च्या तिसऱ्या पर्वात सहभागी होण्याआधी सोनालीने वैजू नंबर वन या मालिकेत प्रमुख भूमिका साकारली होती. ही तिची छोट्या पडद्यावरची पहिली मालिका होती. त्यानंतर सोनालीने 'देवमाणूस' मालिकेत वकीलाची भूमिका केली होती.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi actress, Marathi entertainment