सोनाली बेंद्रे करणार दिग्दर्शनाचा 'आरंभ'

सोनाली  बेंद्रे करणार दिग्दर्शनाचा 'आरंभ'

गोल्डी बेहेल लवकरच छोट्या पडद्यावर आरंभ नावाची एक मेगा बजेट मालिका घेऊन येतोय. या मालिकेचं कथानक लिहिलंय 'बाहुबली' फेम लेखक विजयेंद्रने.

  • Share this:

07 जून : नव्वदच्या दशकात आपल्या अभिनयाने लोकांची मन जिंकणारी ,छमछम गर्ल  सोनाली बेंद्रे आती लवकरच आयुष्यातल्या एका नव्या अध्यायास आरंभ करणार आहे. रील लाईफमध्ये अनेक भूमिका साकारल्यानंतर आता रियल लाईफमध्ये ती एक नवी भूमिका निभावणार आहे-दिग्दर्शकाची !

तर झालयं असं की गोल्डी बेहेल लवकरच  छोट्या पडद्यावर  आरंभ नावाची एक मेगा बजेट  मालिका घेऊन येतोय. या मालिकेचं कथानक लिहिलंय 'बाहुबली' फेम लेखक विजयेंद्रने.  या ' शो'चं शूटिंग सुरूही झालेलं आहे.

सोनाली रोज सेटवर येते आणि काही उपयुक्त टिप्स देऊन जाते. ती  या शोमध्ये प्रचंड इंटरेस्टेड आहे. लवकरच ती काही भागांचं दिग्दर्शनही करेल.

आरंभ आर्य-द्रविडांच्या संघर्षावर बेतलेला एक पिरयड ड्रामा आहे. रजनीश दुग्गल या मालिकेत  प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

First published: June 7, 2017, 1:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading