मुंबई, १४ जून- सलमान खानचा भारत सिनेमा बॉक्स ऑफिसवर तगडी कमाई करत आहे. एकीकडे सलमान आणि कतरिना कैफच्या केमिस्ट्रीचं कौतुक होत आहे, तर दुसरीकडे सोनाली कुलकर्णीला मात्र ट्रोल केलं जात आहे. सोनालीने सिनेमात सलमानच्या आईची भूमिका साकारली आहे. ४४ वर्षीय सोनालीने ५३ वर्षाच्या सलमानच्या आईची भूमिका साकारल्यानेच ती ट्रोल होत आहे. तिला योग्य भूमिका निवडण्याचा सल्लाही नेटकर देताना दिसत आहेत. पण या सर्व गोष्टींचा सोनालीला काहीच फरक पडत नाही.
हेही वाचा- आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’
नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सोनालीला याबद्दल विचारले असता तिने आपलं मत स्पष्ट केलं. सोनाली म्हणाली की, ‘मला व्यक्तिरेखेच्या निवडीवर अभिमान आहे. सलमानच्या आईची भूमिका केल्याचं कोणतंच दुःख मला नाही. व्यक्तिरेखा कोणती निवडावी हे मी ठरवते. मी ज्या व्यक्तिरेखा साकारल्या त्यावर मला अभिमान आहे.’
‘मी प्रेक्षक आणि समीक्षकांच्या सल्ल्याचा मान ठेवते. याआधीही मी हृतिकची आई झाले आहे. २००० मध्ये मिशन कश्मीर सिनेमात हृतिकच्या आईची भूमिका साकारली होती. मला माहितीये की लोक वयाच्या अंतराकडे जास्त लक्ष देतात, पण अनेकदा हे निंदेसाठी नाही तर कलाकारांच्या उत्कर्षासाठीही हे आवश्यक असतं.’
हेही वाचा- VIDEO- ...म्हणून कार सोडून चालत जिममध्ये पोहोचली जान्हवी कपूर
ज्या व्यक्तिरेखा मिळतात त्या समाधान देणाऱ्या आहेत
सोनालीने टॅक्सी नंबर ९२११ सिनेमात नाना पाटेकरच्या पत्नीची भूमिका साकारली होती. या व्यक्तिरेखेची तुफान चर्चा झाली होती. सोनालीने याबद्दल बोलताना म्हटलं की, ‘अनेकदा लोक मला सांगतात की, कमर्शियल सिनेमापेक्षा समांतर सिनेमांमध्ये मी जास्त वैविध्यपूर्ण भूमिका केल्या. मला ही गोष्ट पटतेही. पण मी हे नाही बोलू शकत की, हिंदी सिनेमांमध्ये मला अमूक एक रोल मिळाला असता तर.. मला ज्या भूमिका मिळाल्या त्यात मी समाधाही आहे.’
VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!