Home /News /entertainment /

दीपिकानंतर मराठी स्टारही उतरले मैदानात, JNU हल्ल्याचा केला निषेध

दीपिकानंतर मराठी स्टारही उतरले मैदानात, JNU हल्ल्याचा केला निषेध

JNU हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले

    मुंबई, 07 जानेवारी : नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये झालेल्या मारहाण आणि हल्ल्याच्या सर्वच स्तारातून निषेध होत आहे. बॉलिवडूची अभिनेत्री दीपिका पदुकोणही JNU मध्ये जाऊन विद्यार्थ्यांना पाठिंबा दिला. आता मराठी सिनेसृष्टीतूनही सोनाली कुलकर्णीने विद्यार्थ्यांवरील हल्ल्याचा निषेध व्यक्य केला आहे. JNU हल्ल्याचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटत आहे. या हिंसाचाराविरोधात आता बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले असून आता स्टार अभिनेत्री दीपिका पदूकोणही जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांच्या भेटीला दाखल झाली होती.  दीपिकाने साबरमती हॉस्टेलमध्ये जाऊन विद्यार्थ्यांची भेट घेतली आणि झालेल्या प्रकाराविरोधात निषेध वर्तवला आहे. यावेळी दीपिकाच्याबरोबर कन्हैया कुमारही उपस्थित होता. त्यानंतर मराठी सिनेसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांनी JNU वरील हल्ल्याचा निषेध व्यक्त केला. आपल्या देशात तुम्हाला आंदोलन करण्यापासून कुणीही रोखू शकत नाही, असं म्हणत सोनालीने JNU च्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे. दरम्यान, दीपिका जेएनयूमध्ये गेल्याच्या बातम्या माध्यमांवर पसरल्यानंतर नेटकऱ्यांनी दीपिकाला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. छपाक सिनेमावर बंदी आणावी यासाठी सोशल मीडियावर दीपिका विरोधात ट्रोलिंग सुरू झालं आहे. काही नेटकरी दीपिकाच्या विरोधात बोलत आहेत तर काही नेटकऱ्यांनी दीपिकाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ट्वीटरवर #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्रेंड करत आहेत. छपाक सारखा सिनेमा करणारी दीपिका तुकडे-तुकडे गँगला भेटण्यासाठी गेली अशा टीका करत नेटकऱ्यांनी दीपिकाचा छपाक सिनेमा पाहू नका असा ट्रेंड सुरू केला आहे. रविवारी 5 जानेवारीला रात्री काही बुरखाधारी लोकांनी युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये घुसून विद्यार्थी आणि प्राध्यापकांना मारहाण केली. या हल्ल्याच्या निषेध करण्यासाठी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटी रस्त्यावर उतरले आहेत. काल रात्रभर मुंबईमध्ये अनेक सेलिब्रेटी आंदोलन करताना दिसले. या दरम्यानं दिग्दर्शक विशाल भारद्वाजनं या आंदोलनात एक कविता सादर केली. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे. जेएनयू हल्ला प्रकरणी बॉलिवूडकारांनी केलेल्या आंदोलनात दिग्दर्शनात दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांनी एक कविता वाचली. ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे. याशिवाय ही कविता विशाल यांनी त्याच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरही शेअर केली आहे. या कवितेच्या ओळी आहेत. 'हम मायूस नहीं हैं, हम हैरान नहीं, जैसा सोचा था तुम वैसे ही निकले' विशाल यांनी या कवितेतून भावुक अंदाजात JNU हल्ला प्रकरणी विरोध जाहिर केला. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. युट्यूब चॅनेल मोजो स्टोरीनं हा व्हिडीओ पब्लिश केला आहे. JNU मध्ये झालेल्या हल्ल्याचा याआधीही अनिल कपूर, आलिया भट, राजकुमार राव, ट्विंकल खन्ना, अनुराग कश्यप आणि सोनम कपूर यांनी निषेध केला होता. या हल्ल्याला सर्वांनीच भ्याड, भीतीदायक आणि निर्दयी म्हटलं आहे. असा भ्याड हल्ला करणाऱ्या व्यक्तींवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: JNU

    पुढील बातम्या