मुंबई,19 मार्च- मराठी मनोरंजन सृष्टीतील आघाडीच्या नायिकांपैकी एक अशी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीची ओळख आहे. सोनालीने नेहमीच विविध धाटणीच्या भूमिका साकारत प्रेक्षकांना भुरळ पाडली आहे. अभिनेत्रीच्या अभिनयाचं नेहमीच कौतुक होतं. मात्र सोनालीच्या एका वक्तव्याने खळबळ माजवली आहे. सोनाली कुलकर्णीने नुकतंच एका कार्यक्रमामध्ये म्हटलं होतं की, 'भारतीय मुली आळशी असतात'. अभिनेत्रीने असंही म्हटलं होतं की, मुली आपल्या करिअरच्या मागे वेड्या होण्याऐवजी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी बॉयफ्रेंड किंवा नवऱ्याचा शोध घेतात. सोनालीला या विधानामुळे प्रचंड टीकेचा सामना करावा लागत आहे.
दरम्यान आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर अभिनेत्रीच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जात आहे. अशा परिस्थिती आता सोनाली कुलकर्णीने आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. सोनालीने इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट शेअर करत लिहलंय, ''ज्या महिलांना संदर्भ समजला नाही त्या कदाचित दुखावल्या गेल्या असतील. परंतु प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर ,मी जे काही बोलले ते बरोबर होतं. तसेच, हे प्रत्येक स्त्रीबद्दल नव्हतं. ते खरोखरच लागू होतं अशा स्त्रियांसाठी होतं'.
आपल्या पोस्टमध्ये सोनालीने पुढे लिहलंय की, 'मला येत असलेल्या कमेंट्स आणि प्रतिक्रियांनी मी भारावून गेले आहे. मला सामील झाल्याबद्दल मी तुम्हा सर्वांचे आणि विशेषत: संपूर्ण प्रेस आणि मीडियाचे आभार मानू इच्छिते. मी स्वतः एक स्त्री असल्यामुळे इतर महिलांना दुखवण्याचा माझा कोणताच हेतू नव्हता'.खरंच सांगायचं तर, मी महिलांच्या समर्थनार्थ वेळोवेळी स्वतःला व्यापकपणे व्यक्त केलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे एक स्त्री म्हणून ते केलं आहे. तिने पुढे लिहलंय, कौतुक किंवा टीका करणाऱ्या प्रत्येकाची मी वैयक्तिकरित्या आभारी आहे. आशा आहे की आपण विचारांची अधिक मुक्तपणे देवाणघेवाण करु शकू'.
'मी माझ्या क्षमतेमधून फक्त महिलाच नव्हे तर संपूर्ण मानव जातीसोबत भाष्य करण्याचा, विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु मला असं वाटतं की, जेव्हा आपण स्त्रिया आपल्या कमकुवतपणा आणि ज्ञानासोबत निष्पक्ष आणि सक्षमपणे पुढे येऊ तेव्हाच ते मजबूत होईल'. असं अभिनेत्रीने लिहलं आहे.
'आपण सर्वसमावेशक आहोत आणि आपण सहानुभूतीपूर्ण जगण्यासाठी एक निरोगी, आनंदी जागा तयार करू शकू.नकळत माझ्या बोलण्याने कुणी दुखावले असेल तर मी मनापासून माफी मागू इच्छितो, असं अभिनेत्रीने लिहलं आहे. मला प्रसिद्धीच्या झोतात राहायचं नाही आणि मला खळबळजनक घटनांचे केंद्रही बनायचं नाही. मी एक कट्टर आशावादी आहे आणि माझा ठाम विश्वास आहे की जीवन खरोखरच सुंदर आहे.तुमच्या संयम आणि समर्थनाबद्दल धन्यवाद. या घटनेतून मी खूप काही शिकले आहे'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.