मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Mylek Marathi Movie: 'या' अभिनेत्रीची मुलगी करणार सिनेसृष्टीत पदार्पण, 'मायलेक'चा मुहूर्त संपन्न

Mylek Marathi Movie: 'या' अभिनेत्रीची मुलगी करणार सिनेसृष्टीत पदार्पण, 'मायलेक'चा मुहूर्त संपन्न

Sonali khare

Sonali khare

सोनाली खरे ही बऱ्याच दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर आहे पण ती एका नव्याकोऱ्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्यासोबत मराठीतील आघाडीचा अभिनेतासुद्धा प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

  • Published by:  Nishigandha Kshirsagar
मुंबई, 19 ऑगस्ट : मराठी अभिनेत्री, युट्युबर अशा भूमिका निभावणारी  सोनाली खरे आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोनाली खरेने आतापर्यंत तिच्या अभिनयाची छाप प्रेक्षकांवर पडली आहेच पण आता ती  'मायलेक' या  चित्रपटाद्वारे  निर्माती म्हणून तिची प्रतिभा दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मायलेक' या चित्रपटाच्या शूटिंगला सध्या लंडनमध्ये सुरुवात झाली आहे. सोनाली खरेने सोशल मीडियावर फोटो शेअर करत चाहत्यांना ही  आनंदाची बातमी दिली आहे. ब्लूमिंग लोटस या तिच्या प्रोडक्शन कंपनीद्वारे या चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या 'मायलेक' चित्रपटाद्वारे सोनालीची मुलगी सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण करणार आहे. सोनाली आणि सनाया या मायलेकींचीच जोडी मुख्य भूमिकेत दिसणार असून  सनाया आनंद ही सोनालीची मुलगी मायलेक चित्रपटात तिच्या मुलीची भूमिका साकारणार आहे.  आई-मुलीच्या आयुष्यतील छोट्याछोट्या गोष्टी टिपणारा हा एक मस्त चित्रपट असणार आहे. यात आई-मुलीचं नातं उलगडून सांगितलं जाणार आहे. अभिनेत्री सोनाली खरेने अलीकडेच, मदर्स डेच्या निमित्ताने सोनालीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर तिच्या 'मायलेक' या मराठी चित्रपटाच्या पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली होती. या चित्रपटात  अभिनेता उमेश कामत मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्याच्याबरोबरच संजय मोने ही  चित्रपटात दिसणार आहेत. प्रियांका तन्वर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून लंडनमध्ये  'मायलेक' चित्रपटाचा काल मुहूर्त पार पडला आहे.
हा चित्रपट आई आणि मुलीच्या नात्यावर आधारित असणार आहे. आई-मुलीच्या आयुष्यतील छोट्याछोट्या गोष्टी टिपणारा हा एक मस्त चित्रपट असणार आहे. यात आई-मुलीचं नातं उलगडून सांगितलं जाणार आहे. या चित्रपटात  उमेश कामत याची भूमिका काय असेल हा अजून स्पष्ट झालं नाहीये. तरी येणाऱ्या वर्षात हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. हेही वाचा - Spruha Joshi : 'तुम्ही दहा वर्षांनंतरही...'; स्पृहाच्या थ्रोबॅक व्हिडीओवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स सोनाली खरे ही  बऱ्याच दिवसांपासून अभिनय क्षेत्रापासून दूर असली तरी तिचं  'खरे बोल' हे युट्युब चॅनेल जोरदार सुरु आहे. आता तिला निर्माती च्या भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेत  तिला शुभेच्छाही दिल्या आहेत. उमेश कामत याने काही दिवसांपूर्वीच 'नवी सुरुवात' म्हणत चाहत्यांसोबत काही फोटो शेअर केले होते.  त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अनेक तर्क वितर्क लढवले होते.  आता तो 'मायलेक' चित्रपटाच्या शूटिंगसाठी लंडनला गेल्याचं स्पष्ट झालं आहे. उमेश कामत मध्यंतरी सोनी मराठीवर 'अजूनही बरसात आहे' या मालिकेत मुक्त बर्वे सोबत दिसला होता. तसेच त्याच्या 'दादा एक गुड न्यूज आहे' या नाटकाचे जोरदार प्रयोग चालू आहेत. अशातच त्याला आता नव्याकोऱ्या चित्रपटात नवीन भूमिकेत बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक झालेत.
First published:

Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

पुढील बातम्या