सोनाली बेंद्रे म्हणते, 'मुझे सब नही पता...'

उपचारांदरम्यान स्वतःला सकारात्मक ठेवत सोनालीने अनेकांसमोर आदर्श तर ठेवलाच आहे शिवाय परिस्थितीला घाबरून न जाता ती मोठ्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 25, 2019 06:43 PM IST

सोनाली बेंद्रे म्हणते, 'मुझे सब नही पता...'

मुंबई, २५ फेब्रुवारी २०१९- गेल्या वर्षी अमेरिकेत सहा महिने कर्करोगाशी लढा देऊन सोनाली बेंद्रे डिसेंबर महिन्यात भारतात परतली. तिचा हा लढा अजून संपलेला नाही. पण तरीही सोनाली बेंद्रेने आजाराला न घाबरता लढण्याचा निर्णय घेतला आहे. नुकतंच तिने कामालाही सुरुवात केली आहे. उपचारांदरम्यान स्वतःला सकारात्मक ठेवत सोनालीने अनेकांसमोर आदर्श तर ठेवलाच आहे शिवाय परिस्थितीला घाबरून न जाता ती मोठ्या प्रयत्नांनी पुन्हा एकदा कॅमेऱ्यासमोर उभी राहिली आहे. यातच सोनाली अर्धी लढाई जिंकली असंच म्हणावं लागेल. ती नेमकी कशाचं चित्रीकरण करतेय याबद्दल साऱ्यांनाच उत्सुकता होता आता तिनेच याचं उत्तर दिलं आहे.


सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले. हे फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘आईकडे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असतं असाच साऱ्यांचा समज असतो. यामुळेच अनेकदा त्या कोणाकडे मदतही मागत नाहीत. तसंच ज्ञान वाटल्याने समोरच्याला त्याचा फायदा होतो आणि तो त्यातून काही तरी शिकतो.’

हा शो खासकरून नव्याने आई झालेल्या महिलांसाठी असेल असेच या कॅप्शनवरून वाटते. बाळ जन्माला आल्यानंतर सगळ्या गोष्टी आईला माहिती असतातच अशा आविर्भावात तिच्यासोबत व्यवहार केला जातो. पण तिही हा अनुभव पहिल्यांदा घेत असल्याचा विचार फारसा कोणाच्या मनात येत नाही. या कार्यक्रमातून अशा महिलांन त्यांचं ज्ञान आणि अनुभव शेअर करण्याची संधी देण्यात येणार आहे.

सोनालीही स्वतः एका मुलाची रणवीरची आई असून तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ती मुलाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. रणवीर आणि तिच्या नात्याबद्दल बोलताना सोनाली म्हणते की त्याची आ कमी आणि मैत्रीण जास्त आहे. आता या कार्यक्रमात तिला इतर महिलांना भेटता येणार असल्यामुळे साऱ्यांच्याच अनुभवात भर पडेल यात काही शंका नाही.

Loading...


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 25, 2019 06:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...