S M L

धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झालाय. तिनं स्वत:च फेसबुक आणि ट्विटरवर हे सांगितलंय. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनालीला झालेला हा कॅन्सर पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.

Sonali Deshpande | Updated On: Jul 4, 2018 01:20 PM IST

धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा

मुंबई, 04 जुलै : एक धक्कादायक बातमी. अभिनेत्री सोनाली बेंद्रेला कॅन्सर झालाय. तिनं स्वत:च फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर हे सांगितलंय. अभिनेता इरफान खाननंतर आता सोनालीला झालेला हा कॅन्सर पाहून सर्वांनाच धक्का बसलाय.

ती आपल्या पोस्टमध्ये म्हणते, प्रकृती थोडी बिघडली, म्हणून टेस्ट केल्या. तेव्हा कॅन्सरचं निदान झालं. आता या आजाराशी लढायचा मी प्रयत्न करतेय. डाॅक्टरांचे सल्ले घेतेय. न्यूयाॅर्कमध्ये उपचार सुरू आहे. माझ्यासोबत माझं कुटुंब आणि मित्रमैत्रिणी आहेत.

इंडियाज ड्रामेबाज या रिअॅलिटी शोमध्ये ती जज होती. पण गेले काही दिवस ती प्रकृती अस्वास्थ्यामुळे येत नाहीय. आता तिच्या जागी हुमा कुरेशी आलीय.सोनाली सध्या ती न्यूयाॅर्कमध्ये उपचार घेतेय. तिच्या सोबत तिचा पती गोल्डी बहेलही आहे. आपण यातून बरे होऊ याचा तिला विश्वास आहे.

सोनाली बेंद्रेच्या बाॅलिवूडमधल्या काही भूमिका कायमच लक्षात राहिल्यात. हम साथ साथ है, सरफरोश, डुप्लिकेट अशा सिनेमांतल्या भूमिका गाजल्या. अमोल पालेकरांच्या अनाहत या मराठी सिनेमात तिनं मुख्य भूमिका साकारली होती. तीही लक्षणीय ठरली. अगबाई अरेच्चा सिनेमात तिनं आयटम साँगही केलंय.

सोनाली लवकर बरी होऊन परत येऊ दे अशी प्रार्थना तिचे फॅन्स करतायत.

Loading...
Loading...

 

अभिनेता इरफान खान सध्या न्यूरोएंडोक्राइन कॅन्सर  या दुर्धर आजारावर लंडनमध्ये उपचार घेतोय. आपलं काम,करियर, आरामदायी आयुष्य सगळ्या गोष्टींना पूर्णविराम मिळालाय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 12:56 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close