Elec-widget

Sonali Bendre: असा होता सोनालीचा आहार

Sonali Bendre: असा होता सोनालीचा आहार

आम्ही सगळेच सकस आहार घेण्याला प्राधान्य देतो. आजही आमच्या घरी सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खाल्ले जातात

  • Share this:

मुंबई, 04 जुलै: बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली बेंद्रे कर्करोगग्रस्त असल्याचे तिनेच सोशल मीडियावर शेअर करुन सांगितले. ती सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. तिने सोशल मीडियावर ही बातमी देता साऱ्यांनाच तिच्या तब्येतीची काळजी वाटू लागली. काही दिवसांपूर्वी 'फादर्स डे'चे औचित्य साधून तिने एका वेबसाइटला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत तिने तिचा नियमित आहार, योग्य व्यायाम आणि जीवनशैलीबद्दल माहिती दिली होती.

हेही वाचा: Sonali Bendre: कर्करोगाबद्दल लिहिली 'ही' भावनिक पोस्ट

सोनालीने तिच्या सुदृढ आरोग्याचे श्रेय तिच्या बाबांना दिले होते. 'माझे बाबा त्यांच्या आरोग्याबाबत नेहमीच जागरुक असतात. त्यांनीच मला लहानपणापासून योग्य आहार करण्याचा आणि सुदृढ राहण्यास ठरवले. मला अजूनही आठवतं आमच्या घरी दररोज भिजलेले बदाम खाण्याची एक पद्धत होती. आम्ही बाबांनी सांगितलेल्या सर्व सवयी नित्य नियमाने पाळायचो.' सोनालीने तिच्या लहानपणीची ही सवय पुढे नवरा आणि मुलालाही लावली.

हेही वाचा: धक्कादायक! सोनाली बेंद्रेला झाला कॅन्सर, स्वत: अभिनेत्रीनं केला खुलासा

'आम्ही सगळेच सकस आहार घेण्याला प्राधान्य देतो. आजही आमच्या घरी सकाळी उठल्यावर भिजलेले बदाम खाल्ले जातात. सकाळचा भरपेट नाश्ता करण्याकडे आम्ही अधिक लक्ष देतो. यात पॅनकेक, फळं, ओट्स अशा गोष्टींचा समावेश असतो.' आपल्या आरोग्याची एवढी काळजी घेऊनही सोनाली बेंद्रेसोबत असे का झाले याचे उत्तर आज कोणाकडेच नसेल. पण तिला झालेल्या या आजारातून ती लवकरात लवकर बरी होवो अशीच इच्छा तिचे चाहते करत असतील यात काही शंका नाही.

Loading...

हेही वाचा: भारत- इंग्लंड सामन्यात 'या' 7 विक्रमांची नोंद, विराटच्या नावे दोन विक्रम

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 02:45 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...