News18 Lokmat

सोनाली बेंद्रेला तिच्या मुलानं दिल्या 'या' टिप्स

नुकताच सोनालीनं आपल्या मुलासोबतचा एक फोटो बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. दोघं घराच्या गॅलरीत उभे आहेत. मुलाच्या हातात पुस्तक आहे. दोघांचे चेहरे स्माइलिंग आहेत.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 02:10 PM IST

सोनाली बेंद्रेला तिच्या मुलानं दिल्या 'या' टिप्स

मुंबई, 24 डिसेंबर : कॅन्सरवर उपचार घेत असलेली सोनाली बेंद्रे आता भारतात परतलीय. ती आपल्या कुटुंबासोबत जास्तीत जास्त वेळ घालवते. न्यूयाॅर्कमध्ये असताना सोनाली आपल्या मुलाला रणवीरला खूप मिस करायची. अनेकदा तसं ती सोशल मीडियावर पोस्टही करायची.

नुकताच सोनालीनं आपल्या मुलासोबतचा एक फोटो बऱ्याच दिवसांनी सोशल मीडियावर पोस्ट केलाय. दोघं घराच्या गॅलरीत उभे आहेत. मुलाच्या हातात पुस्तक आहे. दोघांचे चेहरे स्माइलिंग आहेत.

सोनालीनं म्हटलंय, पहिल्यांदा रणवीरनं मला कुठलं पुस्तक वाचायला हवं हे सजेस्ट केलंय. मी ते वाचतेय. मला छान वाटतंंय. हा अनुभव तुम्हीही घेऊन पहा.

सोनाली बेंद्रेला कॅन्सर झाल्याचं कळलं, तेव्हा तिची स्टेज चौथी होती. न्यूयाॅर्कमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. सध्या ती मुंबईत आहे आणि तब्येतीत सुधारणा होतेय.

Loading...

मधुरा-विक्रम आणि नील-भैरवी नव वर्षाचं करतायत रोमँटिक स्वागत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 24, 2018 02:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...