S M L

Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

लोकांच्या आयुष्यातील घटना वाचल्यानंतर मला एक वेगळी उर्जा मिळाली असून या प्रवासात मी एकटी नाही हे मला आता कळलं आहे.

Updated On: Jul 10, 2018 03:11 PM IST

Sonali Bendre Photo: कर्करोगग्रस्त सोनाली बेंद्रे आता दिसतेय अशी, समोर आला फोटो

मुंबई, 10 जुलैः काही दिवसांपूर्वी सोनाली बेंद्रेने तिला कर्करोग झाल्याचे सोशल मीडियावर एका पोस्टद्वासे सांगितले होते. सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. सोनालीचे आजारासंबंधिचे पोस्ट वाचल्यावर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमधील कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच तिला लवकराच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनालीनेही तिला शक्य तितक्या ट्विटना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

आज सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा उपचारांदरम्यानचा एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिच्या मोठ्या केसांपासून ते लहान केसांपर्यंतचा प्रवास भावनिकपद्धतीने दाखवला आहे. हा फोटो शेअर करताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत. ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याच्या घटना तिच्यासोबत शेअर केल्या त्या सर्वांचे तिने आवर्जुन आभार मानले आहेत. सोनाली म्हणाली की, 'लोकांच्या आयुष्यातील घटना  वाचल्यानंतर मला एक वेगळी उर्जा मिळाली असून या प्रवासात मी एकटी नाही हे मला आता कळलं आहे.'

या फोटोमध्ये सोनाली फार अशक्त दिसते. पण तरीही तिच्यातील खेळकर वृत्ती काही कमी झाली नाही. मोठे केस कापताना तिला झालेले दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत असले तरी पुढील सर्व लढाईसाठी ती आता सज्ज झाली आहे हेच हा व्हिडिओ सर्वांना सांगतो. सोनालीची तब्येत जरी खालावलेली असली तरी तिच्या चेहऱ्यावरचं हसू तसूभरही कमी झालेलं नाही. सोनालीचं हेच हसू तिला या आजारातून बाहेर काढेल अशाच प्रतिक्रिया तिच्या या फोटोला येत आहेत.


In the words of my favourite author Isabel Allende, “We don't even know how strong we are until we are forced to bring that hidden strength forward. In times of tragedy, of war, of necessity, people do amazing things. The human capacity for survival and renewal is awesome.” The outpouring of love I’ve received in the last few days has been so overwhelming… and I’m especially grateful to those of you who shared stories of your experiences in dealing with cancer, whether it was your own or of loved ones. Your stories have given me an extra dosage of strength and courage, and more importantly, the knowledge that I’m not alone. Each day comes with its own challenges and victories and so for now, I’m taking this #OneDayAtATime. The only thing I’m trying to be consistent about is maintaining a positive outlook... literally #SwitchOnTheSunshine - it’s my way of dealing with this. Sharing my journey is also part of this process... I can only hope it reminds you that all is not lost and that someone, somewhere understands what you’re going through.

Loading...

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

गेल्या आठवड्यात सोनालीने भावूक मेसेज लिहीत तिला कर्करोग झाल्याचे सांगितले होते, सोनाली बेंद्रेनं लिहिलं, कधीकधी, अगदी अनपेक्षितरित्या, तुमचं आयुष्य एक वळण घेतं. मला नुकतंच हायग्रेड कॅन्सरचं निदान झालं आहे. जो सातत्यानं पसरत चालला आहे. असं निदान होणं हे आमच्यासाठी अनाकलनीय होतं. माझं कुटुंब आणि मित्रपरिवार सातत्यानं माझ्यासोबत होता आणि त्यांनी मला प्रचंड पाठिंबा दिला. असे जीवलग लाभणं ही भाग्याची गोष्ट आहे. मी त्या प्रत्येकाची आभारी आहे. त्वरित उपचार करणं याशिवाय याच्याविरोधात लढण्याचा आणखी चांगला पर्याय नाही.त्यामुळेच, माझ्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. आम्ही खूप आशावादी आहोत आणि प्रत्येक टप्प्यावर या आजाराशी लढण्याचा आम्ही निर्धार केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 10, 2018 02:59 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

  • I agree to receive emails from NW18

  • I promise to vote in this year's elections no matter what the odds are.

    Please check above checkbox.

  • SUBMIT

Thank you for
taking the pledge

But the job is not done yet!
vote for the deserving condidate
this year

Click your email to know more

Disclaimer:

Issued in public interest by HDFC Life. HDFC Life Insurance Company Limited (Formerly HDFC Standard Life Insurance Company Limited) (“HDFC Life”). CIN: L65110MH2000PLC128245, IRDAI Reg. No. 101 . The name/letters "HDFC" in the name/logo of the company belongs to Housing Development Finance Corporation Limited ("HDFC Limited") and is used by HDFC Life under an agreement entered into with HDFC Limited. ARN EU/04/19/13618
T&C Apply. ARN EU/04/19/13626

Live TV

News18 Lokmat
close