Elec-widget

कॅन्सरनंतर पतीमध्ये झाला बदल, सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट

कॅन्सरनंतर पतीमध्ये झाला बदल, सोनाली बेंद्रेची भावनिक पोस्ट

सोनालीने तिच्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त पती गोल्डी बहेल याला शुभेच्छा देत एक भावनिक पोस्ट केली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 नोव्हेंबर : बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेने कॅन्सरसारख्या आजारावर मात करुन नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी तिला कॅन्सर झाल्याचे निदान झाले. त्यानंतर अमेरिकेत उपचार घेऊन ती जानेवारीत भारतात परतली. तेव्हापासून सोनाली सोशल मीडियावर अधून मधून अपडेट देत असायची. आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहण्याचा संदेशही तिने दिला होता. दरम्यान, आता लग्नाच्या वाढदिवसानिमित्त सोनालीने पती गोल्डी बहेल कशा पद्धतीनं या आजारपणात तिच्या पाठिशी खंबीरपणे उभा होता हे सांगणारी भावनिक पोस्ट लिहिली आहे.

सोनाली आणि गोल्डी यांच्या लग्नाला 18 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त सोनालीने पतीसोबतचे फोटोज शेअर केले आहेत. सोनालीने म्हटलं की, गेल्या वर्षी यादिवशी आम्ही न्यूयॉर्कच्या रुग्णालयात होतो. जेव्हा मला कॅन्सर झाल्याचं समजलं तेव्हा बेंद्रे आणि बहेल या दोन्ही कुटुंबामध्ये बदल झाले. त्या बदलाने कर्करोगापूर्वीचं आणि कर्करोगानंतरचं कुटुंब अशी त्यांची विभागणी झाली. कॅन्सरच्या आठवणी बाजूला ठेवून आयुष्याकडं सकारात्मक पाहण्याचं मी ठरवलं आहे. ज्यामुळे मनाला आनंद होईल ते करायचं आणि नवं शिकून घ्यायचं ठरवलं आहे.

View this post on Instagram

This day, last year... we were in New York at the hospital. Since then, the Bendre-Behls have identified two time periods - B.C. (Before Cancer) and A.C. (After Cancer). Lately, my motto has been to move on & keep trying new things, and detoxing and rejuvenating is on top of the list. So on the occasion of our 17th wedding anniversary, I thought let’s take a break and go on a road trip to @atmantan. Before Cancer, Goldie would have never agreed to something like this but I love how he's changed 😄 He has put everything on standby and has been focusing so much on me... and now I'm turning the focus back on him. P.S. Happy Anniversary @goldiebehl, I love you more than you could imagine... thank you for being my pillar of strength in health & sickness... literally!

A post shared by Sonali Bendre (@iamsonalibendre) on

गोल्डीसोबत लग्नाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक ट्रिप काढायचा प्लॅन झाला. मला कॅन्सर होण्यापूर्वी जर मी त्याला ट्रिपसाठी चल म्हटलं असतं तर तो तयार झाला नसता पण आता तो बदलला आहे. तो ट्रिपसाठी तयार झाला आणि त्याच्यात झालेला बदल चांगला आहे. मला तो बदल आवडला. मी आजारी असताना त्यानं सर्वकाही बाजूला ठेवून मला प्राधान्य दिलं. आता त्याला प्राधान्य द्यायची वेळ आहे असंही सोनाली म्हणाली.

Loading...

गोल्डीला लग्नाच्या शुभेच्छा देताना सोनाली म्हणाली की, तू कल्पनाही करणार नाहीस एवढं तुझ्यावर माझं प्रेम आहे. मला आधार दिलास आणि माझ्यामागे खंबीरपणे उभा राहिलास त्याबद्दल खूप आभार, गोल्डी तुला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटलं

गेल्या वर्षी जुलै महिन्यात सोनालीने हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर सोनालीने अमेरिकेत उपचार घेतले आणि नववर्षाच्या सुरुवातील भारतात परतली.

VIDEO : भाजपसोबत सरकार स्थापन करणार का? उद्धव ठाकरेंनी दिलं 'हे' उत्तर

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 13, 2019 02:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...