Home /News /entertainment /

‘सर्जरीच्या 23-24 इंच जखमा असूनही मला चालावं लागत होतं,’ सोनाली बेंद्रेने सांगितली कॅन्सर सर्जरीची वेदनादायी आठवण

‘सर्जरीच्या 23-24 इंच जखमा असूनही मला चालावं लागत होतं,’ सोनाली बेंद्रेने सांगितली कॅन्सर सर्जरीची वेदनादायी आठवण

सोनालीने ती आणि तिचा पती गोल्डी बहलने (Goldie Behl) तिच्या कॅन्सरपूर्वी आणि कॅन्सरनंतरच्या काळात काय बदल अनुभवले त्याबद्दल सांगितलं.

नवी दिल्ली, 25 मे : अभिनेत्री सोनाली बेंद्रेने (Sonali Bendre) तिच्या अभिनयामुळे प्रेक्षकांच्या मनात स्वतःचं स्थान निर्माण केलं. सोनाली आजही अनेकांची क्रश आहे. या मराठमोळ्या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये (Bollywood) मोजक्याच भूमिका केल्या, परंतु, तिचं काम आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. याशिवाय तिने छोट्या पडद्यावर अनेक रिअॅलिटी शो जज केले आहेत. याच सोनालीला 2018 मध्ये कॅन्सरसारखा (Cancer) जीवघेणा आजार झाला होता. मात्र तिने कॅन्सरवर मात करत आयुष्यातील मोठी लढाई जिंकली. कॅन्सरवर मात करत अनेकांना प्रेरणा देणाऱ्या 47 वर्षांच्या सोनालीने नुकतंच तिच्या कॅन्सर सर्जरीबद्दलची आठवण एका न्यूज पोर्टलला सांगितली आहे. 2018 मध्ये, अभिनेत्री सोनाली बेंद्रेला मेटास्टॅटिक कॅन्सरचे (Metastatic Cancer) निदान झाले होते. तिचा कॅन्सर सुरुवातीच्या टप्प्यात असल्याने आणि वेळीच उपचार केल्याने ती बरी झाली. परंतु अचानक झालेल्या कॅन्सरच्या निदानामुळे आयुष्याला वेगळं वळण मिळाल्याचं सोनाली सांगते. हा काळ सोनाली आणि तिच्या कुटुंबासाठी खरोखर कठीण होता. कॅन्सरमधून बरी झाल्यानंतर ती जास्त स्ट्राँग झाली आहे आणि तिच्या आयुष्याकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोनही बदलला आहे, असं सोनाली सांगते. या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने वृत्त प्रसिद्ध केलंय. एका न्यूज पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत सोनालीने ती आणि तिचा पती गोल्डी बहलने (Goldie Behl) तिच्या कॅन्सरपूर्वी आणि कॅन्सरनंतरच्या काळात काय बदल अनुभवले त्याबद्दल सांगितलं. “कॅन्सरचं निदान आणि त्याच्या उपचारांच्या टप्प्यांतून गेल्यावर आम्ही त्यापासून बरेच धडे शिकलो आहोत. त्या आजाराची आणि त्या काळाची एकमेकांना आठवण करून देणं हे त्याबद्दल बोलण्याचा उद्देश नाही, परंतु ती प्रक्रिया आणि तो प्रवास खूप महत्त्वाचा होता,” असं सोनालीने सांगितलं. कॅन्सरशी लढा दिल्यानंतर तिच्या दिसण्यात आलेले शारीरिक बदल (Physical Changes) स्वीकारणं, हा तिच्या आयुष्यातील एक कठीण टप्पा होता, असं सोनाली सांगते. न्यूयॉर्कमधील (New York) सर्जरीबद्दल सांगताना ती म्हणाली, ‘त्या सर्जरीनंतर माझ्या शरीरावर 23-24 इंचांच्या जखमा होत्या. तसंच सर्जरीनंतर (Surgery) जेवढ्या लवकर चालणं शक्य होईल तितक्या लवकर तुम्ही चालायला लागा, असा सल्ला डॉक्टरांनी दिला होता, कारण तसं न केल्यास इन्फेक्शन (Infection) होईल अशी त्यांना भीती वाटत होती.

हे वाचा - Cannes 22: अतरंगी ड्रेसमुळे Red Carpet वर दीपिकाची झाली पंचाईत; गाउनचा पसारा सांभाळण्याच्या नादात पाऊल चुकलं आणि... VIDEO

आपल्याला लवकर बरं व्हायचंय, अशी मनात खूणगाठ बांधून सर्जरीच्या 23-24 इंच जखमा असूनही सोनाली चालायला लागली. त्यामुळे त्रासही झाला परंतु ती तिचा IV धरून कॉरिडॉरमध्ये चालत होती. अशा कठीण, वेदनादायी सर्जरी आणि उपचाराच्या अनेक टप्प्यांतून गेल्यावर सोनालीने कॅन्सरवर यशस्वीरित्या मात केली. ती जीवघेण्या आजारातून बरी झाली, त्यानंतर कामावरही परतली. मध्यंतरी छोट्या पडद्यावरील अनेक शोमध्ये ती जज म्हणून दिसली. आता लवकरच सोनाली 'द ब्रोकन न्यूज' मध्ये (The Broken News) अभिनय करताना दिसणार आहे.
First published:

Tags: Bollywood actress

पुढील बातम्या