सोनाली बेंद्रेचा हा Photo पाहून तुम्ही नक्कीच व्हाल इमोशनल

घरी आल्या आल्या अजून एकाला खूपच आनंद झाला. त्यानं तर सोनालीला एक क्षण सोडलं नाही. सोनालीही आपलं प्रेम व्यक्त करतेय. त्याचे लाड करतेय.

News18 Lokmat | Updated On: Dec 5, 2018 01:38 PM IST

सोनाली बेंद्रेचा हा Photo पाहून तुम्ही नक्कीच व्हाल इमोशनल

मुंबई, 5 डिसेंबर : सोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कहून परत मुंबईत आली. गेली 5 महिने ती कॅन्सरवर उपचार घेतेय. तिच्यासोबत गोल्डी बहलही आहे. परत कुटुंब, फ्रेंड्स यांच्यात आल्यामुळे ती खूश आहे.


घरी आल्या आल्या अजून एकाला खूपच आनंद झाला. त्यानं तर सोनालीला एक क्षण सोडलं नाही. सोनालीही आपलं प्रेम व्यक्त करतेय. त्याचे लाड करतेय.


तो आहे तिचा लाडका कुत्रा. तिनं त्याचा फोटो इन्स्ट्राग्रामवर शेअर केलाय. ‘Reunited #LittleMisslcy’ असंही तिनं त्याखाली लिहिलंय.

Loading...
 

View this post on Instagram
 

@iamsonalibendre follow ➡️ @filmijagat4 #bollywood #filmijagat #sonalibendre


A post shared by FILMIJAGAT (@filmijagat4) on


याचवर्षी जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सोनालीने मला हाय ग्रेड कॅन्सर झाला असल्याचं सांगितलं होतं. त्यावर योग्य ते उपचार घेण्यासाठी सोनाली न्यूयॉर्कमध्ये गेली होती.
 सोनालीची तब्येत आता ठीक आहे. ती आजार आता कमी झाल आहे. त्यावर आम्ही रेग्युलर चेकअप करू असं सोनालीच्या पतीने गोल्डी बहलने सांगितलं.


Video : सहा महिन्यानंतर दीपिकाची गुड न्यूज? पहा रणवीर काय म्हणतोय?


येत्या रविवारी इंतजार संपणार, विक्रांत ईशाला सांगणार मनातलं गुपित


Video : सर्जिकल स्ट्राइकवरचा पहिला सिनेमा, पहा चित्तथरारक ट्रेलर

इथे आल्यावर सोनालीनं एक भावुक पोस्ट लिहिली. तिनं लिहिलंय, 'एकमेकांच्या लांब गेल्यानंतर हृदयाने आपण आणखी जवळ येतो असं म्हणतात. आपण लांब गेल्याने ज्या गोष्टी कळतात त्याला कमी समजू नका. न्यूयॉर्कमध्ये, माझ्या घरापासून दूर गेल्यानंतर मला जाणवलं की माझ्या आजूबाजूला बऱ्याच कहाण्या आहेत. प्रत्येकाला आपली एक वेगळी कथा लिहायची आहे. प्रत्येक माणूस त्यासाठी संघर्ष करतो पण कधीही सोडत नाही.'


आता मी तिथे चालली आहे जिथे माझं हृदय आहे, असंही सोनाली म्हणाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 5, 2018 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...