सोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल

सोनाली बेंद्रेच्या या नव्या पोस्टनं तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी येईल

सोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते.

  • Share this:

मुंबई, 15 आॅक्टोबर : सोनाली बेंद्रे न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. सोशल मीडियावर ती तिचे सगळे अपडेट्स देत असते.  उपचार घेताना कितीही त्रास झाला तरीही ती आपलं आयुष्य नाॅर्मल जगतेय. ती आपल्या मित्रमैत्रिणींना भेटतेय. नुकताच तिनं एक फोटो शेअर केलाय.

इन्स्ट्राग्रामवर पोस्ट केलेल्या या फोटोत ती एका गोड कुत्र्यासोबत आहे. त्यात तिनं लिहिलंय, कुत्रा सर्वोत्तम असतो. मी माझं मुंबईचं घर सोडून आले. खूप आठवणी येतात. पण या गोड कुत्र्याबरोबर खेळताना छान वाटतं.

सोनालीला भेटायला अनेक बाॅलिवूड कलाकार न्यूयाॅर्कला पोचलेत. त्यात अनुपम खेर, प्रियांका चोप्रा, ऋषी कपूर, नितू कपूर आहेत.

काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.

सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.

झीवरच्या ड्रामेबाजची जज असतानाच तिला तो शो सोडावा लागलेला. तिच्या जागी हुमा कुरेशी आली. आता या शोचा ग्रँड फिनाले आहे. त्यानिमित्तानं सोनालीनं तिचा एक व्हिडिओ शूट करून सगळ्यांशी संवाद साधलाय.

सोनाली बेंद्रेनं छोट्यांना शुभेच्छा तर दिल्यातच. पण तिनं सेटवरच्या सगळ्यांजवळ जुन्या आठवणींना उजाळा दिलाय. कुणाला तिनं शूजचे फोटो काढून पाठवायला सांगितलेत, तर हुमा कुरेशीचेही आभार मानलेत. शिवाय मी परत येईन, असं आत्मविश्वासानंही तिनं म्हटलंय. हा व्हिडिओ नक्कीच मनाला स्पर्श करतो.

पुरस्कार सोहळ्याला गुरूची शाब्दिक फटकेबाजी आणि राधिकाचा हटके लूक!

First published: October 15, 2018, 1:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading