कॅन्सर झाल्याचं समजल्यावर 'त्या' रात्री सोनालीसोबत नेमकं काय घडलं?

कॅन्सर झाल्याचं समजल्यावर 'त्या' रात्री सोनालीसोबत नेमकं काय घडलं?

नेहा धुपियाच्या 'BFFs विथ वॉग ' या शोमध्ये सोनालीनं तिला कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर तिची परिस्थिती काय होती याविषयी सांगितलं

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही महिन्यांपूर्वीच हायग्रेड कॅन्सवर उपचार घेऊन न्यूयॉर्कवरून भारतात परतली. मागील वर्षी जुलैमध्ये सोनालीनं सोशल मीडियावरून तिला कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रे काही महिन्यांपूर्वीच हायग्रेड कॅन्सवर उपचार घेऊन न्यूयॉर्कहून भारतात परतली. मागील वर्षी जुलैमध्ये सोनालीनं सोशल मीडियावरून तिला कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती.

सोनालीच्या या कठीण काळात तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त तिच्या दोन मैत्रिणी नेहमीच तिच्या पाठीशी खंबीपणे उभ्या राहिल्या. नुकतीच सोनालीनं तिच्या दोन्ही मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री ओबेरॉय यांच्यासोबत नेहा धुपिया चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.

सोनालीच्या या कठीण काळात तिच्या कुटुंबीयांव्यतिरिक्त तिच्या दोन मैत्रिणी नेहमीच तिच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. नुकतीच सोनालीनं तिच्या दोन्ही मैत्रिणी सुझान खान आणि गायत्री ओबेरॉय यांच्यासोबत नेहा धुपिया चॅट शोमध्ये हजेरी लावली होती.

नेहा धुपियाच्या 'BFFs विथ वॉग ' या शोमध्ये सोनालीनं तिला कॅन्सर झाल्यानंतर तिची परिस्थिती काय होती याविषयी सांगितलं आणि याविषयी बोलताना ती खूप भावूक झालेली दिसली. ज्या दिवशी सोनालीला कॅन्सविषयी समजलं ती रात्र सोनालीसाठी किती कठीण गेली याविषयी सोनाली याठीकाणी मोकळेपणानं बोलली.

नेहा धुपियाच्या 'BFFs विथ वॉग ' या शोमध्ये सोनालीनं तिला कॅन्सर झाल्याचं समजल्यानंतर तिची परिस्थिती काय होती याविषयी सांगितलं आणि याविषयी बोलताना ती खूप भावूक झालेली दिसली. ज्या दिवशी सोनालीला कॅन्सरविषयी समजलं ती रात्र सोनालीसाठी किती कठीण गेली याविषयी सोनाली याठिकाणी मोकळेपणानं बोलली.

सोनाली म्हणाली, जेव्हा मी याबद्दल ऐकलं तेव्हा मला वाटलं की, कोणत्यातरी ट्रेनने मला जोरात धक्का दिला आहे. त्या रात्री मी अजिबात झोपू शकले नाही. मी त्या रात्री ही गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट स्वीकारली आणि शेवटी हा विचार केला की मी आज शेवटचं या गोष्टीसाठी रडतेय की मला कॅन्सर का आणि कधी झाला.

सोनाली पुढे म्हणाली, त्यावेळी ठरवलं यानंतर मी कधीच रडणार नाही फक्त हसत आणि आनंदी राहीन. मी उगवत्या सूर्याकडे पाहिलं तो माझ्यासाठी प्रेरणादायी ठरला. मी तो फोटो क्लिक केला आणि म्हटलं, 'Girls, Switch on the Sunshine'

माझ्या या काठीण काळात माझ्या या दोन्ही मैत्रिणींनी मला खूप पाठींबा दिला. प्रत्येकवेळी त्या माझ्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या. मला वाटतं हे माझ्या आयुष्यातील चांगले क्षण होते. असं सोनाली म्हणाली. गायत्री आणि सुझान सोनालीला भेटण्यासाठी न्यूयॉर्कला गेल्या होत्या.

कॅन्सरच्या ट्रिटमेंट दरम्यान सोनाली बेंद्रे सोशल मीडियावर बरीच सक्रिय होती. तिच्या इन्स्टाग्राम पोस्टमधील #OneDayAtATime आणि #SwitchOnTheSunshine हे दोन हॅशटॅग ट्रेंडमध्ये राहिले होते. सोनालीच्या सर्व पोस्टमध्ये हे हॅशटॅग खासकरून सर्वांना पाहायला मिळाले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 3, 2019 01:53 PM IST

ताज्या बातम्या