सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिलीय.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2018 02:58 PM IST

सोनाली बेंद्रेच्या प्रकृतीबद्दल तिच्या नवऱ्यानं दिली पहिली प्रतिक्रिया

मुंबई, 03 आॅगस्ट : एकीकडे इरफान खाननं ट्विट केलं की मृत्यू कधीही त्याला कवटाळू शकतो. तशी फॅन्सना त्याची एकदम काळजी वाटायला लागली. आणि बाॅलिवूडच्या दुसऱ्या सेलिब्रिटीबद्दल चिंता वाटायला लागली. अर्थातच, आम्ही बोलतोय सोनाली बेंद्रेबद्दल. सोनाली न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. तिनं स्वत:च ट्विट करून हे सांगितलं होतं. शिवाय तिनं केस कापून छोटे केले, तेव्हाही तिनं तो व्हिडिओ शेअर केला होता. एवढंच काय तिचा मुलगा रणवीरला आम्ही या आजाराबद्दल कसं सांगितलं, हेही तिनं शेअर केलं होतं.

आता तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिलीय. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.

सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.

काही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्घर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.

मध्यंतरी सोनालीनं इन्स्ट्राग्रामवर आपल्या मुलाला रणवीरला पत्र लिहिलं.  आपल्या मुलाचा फोटो पोस्ट करत सोनाली लिहिते, ' 12 वर्ष, 11 महिने आणि 8 दिवस आधी ज्या क्षणी रणवीर, माझ्या मुलाचा जन्म झाला त्या क्षणी माझा अॅमेझिंग मुलगा रणवीरनं माझं हृदयच त्याच्या नावे केलं होतं. त्यानंतर माझ्या आणि गोल्डीच्या आयुष्यात रणवीरचा आनंद आणि देखभाल हेच महत्त्वाचं ठरलं. आणि जेव्हा कॅन्सरनं माझ्या आयुष्यात प्रवेश केला तेव्हा आमच्या पुढे एक मोठा प्रश्न होता, तो म्हणजे रणवीरला याबद्दल कसं सांगायचं?

आम्हाला त्याची जेवढी काळजी होती, तेवढंच सत्य सांगायचं होतं. आम्ही आतापर्यंत त्याच्यापासून काही लपवलेलं नाही. आणि आताही सर्व काही खरं खरं सांगितलं. त्यानं सर्व ऐकून घेतलं आणि समजून घेतलं. आणि हे पाहूनच माझ्यात एक प्रकारची शक्तीच आली. आता अनेकदा तो माझा पालक बनतो. काय योग्य, काय अयोग्य ते मला सांगतो.

मला असं वाटतं की अशा परिस्थितीत आपल्या मुलांना सत्य सांगावं. अशा वेळी त्यांच्या सोबत जास्त वेळ काढा. पण अनेकदा आपण मुलांना जीवनातलं सत्य सांगत नाही. ते लपवतो. आता रणवीरच्या सुट्ट्या सुरू आहेत. मी त्याच्याबरोबर आहे. त्याचा खोडकरपणा, खोड्या यामुळे माझं लक्ष त्याच्यात असतं. आम्ही एकमेकांची ताकद बनलोय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Aug 3, 2018 02:58 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close