Elec-widget

न्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल

न्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल

दरवर्षी प्रमाणे सोनालीच्या घरी गणपती आलाय. तिचा मुलगा रणवीर गणेशाची पूजा करतोय.

  • Share this:

मुंबई, 14 सप्टेंबर : गणपती बाप्पांचं आगमन सगळीकडे झालंय. बाॅलिवूड सेलिब्रिटी आपापल्या घरी गणपतीचं जल्लोषात स्वागत करतायत. न्यूयाॅर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या सोनाली बेंद्रेच्या मुंबईच्या घरीही गणपती येतो.

दरवर्षी प्रमाणे सोनालीच्या घरी गणपती आलाय. तिचा मुलगा रणवीर गणेशाची पूजा करतोय. हिरवा कुर्ता घातलेला रणवीरचा सोनालीशिवायचा एकटेपणा फोटोतही जाणवतोय.

सोशल मीडियावर सोनालीनं हा फोटो पोस्ट केलाय. तिनं लिहिलंय, 'गणेश चतुर्थी माझ्या एकदम जवळ आहे. घरातला उत्साह, तयारी मला सगळं काही आठवतंय. मला बाप्पाच्या आशीर्वादावर विश्वास आहे. तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा.'

सोनाली बेंद्रेची ही भावुक पोस्ट वाचून सगळ्यांनाच वाईट वाटलंय. गणपती बाप्पा सोनालीला लवकर बरं करो आणि ती भारतात परत येवो, अशी प्रार्थना प्रत्येकानंच केलीय.

Loading...

काही दिवसांपूर्वी तिचा नवरा गोल्डी बहेलनं ट्विट करून सोनालीच्या खुशालीची माहिती दिली. तो म्हणतो, सोनालीला तुम्ही इतकं प्रेम दिलंत त्याबद्दल धन्यवाद. तिचे उपचार सुरू आहेत. त्यात कसलाच अडथळा येत नाहीय. पण हा प्रवास खूप मोठा आहे.

सोनालीच्या आजारपणात तिचा नवरा, नणंद, मुलगा सगळे नातलग, मित्र मैत्रिणी तिच्या सतत सोबत असतात. आजारी माणसाला हा मोठा अाधार असतो. त्यामुळेच तिची मानसिक स्थिती एवढ्या आजारातही उत्तम राहतेय.

काही दिवसांपूर्वी तिच्या तब्येतीची माहिती तिची नणंद सृष्टी आर्यानं दिली. सोनाली फार खंबीर असून ती कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराशी मोठ्या नेटाने दोन हात करत असल्याचं तिने सांगितलं. त्यामुळे सोनालीची प्रकृती आता हळूहळू सुधारत असल्याचं स्पष्ट झालंय. सोनाली बेंद्रेच्या तब्येतीची काळजी प्रत्येकालाच आहे. त्यामुळे या बातमीनं सगळ्यांनी थोडा सुटकेचा श्वास सोडलाय.

सोनाली बेंद्रे सध्या न्यूयाॅर्कला कॅन्सरवर उपचार घेतेय. वेळोवेळी सोशल मीडियावरून ती आपली परिस्थिती कशी आहे, हे सांगत असते. मध्यंतरी तिनं आपल्या मुलाला रणवीरला आपण कॅन्सरबद्दल कसं सांगितलं, याची माहिती दिली होती.

दर ऋषीपंचमीला प्रसाद ओक घेतो दगडूशेठ गणपतीचं दर्शन

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 14, 2018 03:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...