हृतिक आणि सुझानबरोबर सोनाली बेंद्रेनं एंजॉय केला संडे; हे फोटो झाले व्हायरल

सोनालीला 2018मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं पण आपल्या आजारपणातही ती नेहमीच सकारात्मक राहिली.

  • Share this:

बॉलिवूड अभिनेत्री सोनाली काही दिवसांपूर्वीच कॅन्सरवर उपचार घेऊन न्यूयॉर्कहून भारतात परतली. कॅन्सरविरोधातला लढा यशस्वी करून तिने पुन्हा कामाला सुरुवात केली आहे.

सोनालीला 2018मध्ये कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यानंतर ती यावर उपचार घेण्यासाठी न्यूयॉर्कला गेली होती आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या आजारपणातही ती नेहमीच सकारात्मक राहिली. आपल्या चाहत्यांशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत राहिली.

काही दिवसांपूर्वीच प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या मुलाच्या लग्नालाही ती उपस्थित राहिली होती. यावेळी तिच्या चेहऱ्यावरच्या गोड हास्यानं सर्वाची मनं जिंकली.

सोनाली सध्या आपल्या मित्रपरिवारात रमली आहे. ती हल्ली मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त वेळ घालवताना दिसते. रविवारचा दिवस तिनं साजरा केला तिच्या जुन्या मित्रांबरोबर - हृतिक रोशन आणि सुझान खान यांच्याबरोबर साजरा केला. हृतिक- सुझान यांचा घटस्फोट झाला असला, तरी मुलांसाठी ते काही वेळ एकत्र घालवतात. सोनालीच्या निमित्ताने या रविवारी दोन्ही कुटुंब एकत्र होती.

सोनाली आणि सुझाननं यावेळचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या फोटोंमध्ये सोनाली तिचा मुलगा रणवीर आणि पती गोल्डी बहल यांच्याबरोबर दिसत आहे. तसंच हृतिक आणि सुझानही मुलांसोबत आले होते.

सोनाली आणि सुझान खूप चांगल्या मैत्रिणी असून त्या नेहमीच एकमेकींसोबत वेळ घालवतात. एवढेच नाही तर सोनाली न्यूयॉर्कला असताना सुझान तिला भेटायलाही गेली होती त्यावेळचा फोटोही सोनालीनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 18, 2019 05:39 PM IST

ताज्या बातम्या