मुंबई, 05 जुलै: बॉलिवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कर्करोग झाला असून सध्या ती न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. बुधवारी स्वतः सोनालीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन तिच्या या आजाराबद्दल सांगितले होते. अचानक आलेल्या या बातमीमुळे बॉलिवूडमधील साऱ्या कलाकारांनाच धक्का बसला होता. हिंदुस्थान टाइम्सने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, तिला न्यूयॉर्कला पाहण्यासाठी सर्वात आधी अक्षय कुमार गेला होता. दोघांनी वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई दोबारा सिनेमात एकत्र काम केले होते.
हेही वाचा: Buradi Case: धक्कादायक व्हिडिओ समोर, आत्महत्येची मिळून करत होते तयारी
अक्षयला तिच्या या आजाराबद्दल जेव्हा कळले तेव्हा तो सोनालीला भेटायला रुग्णालयात गेला. याबद्दल बोलताना अक्षय म्हणाला की, 'मला माहित आहे की, सोनाली एक लढवय्या आहे. तिची प्रकृती सुधारण्यासाठी देव तिला मदत करो.' सोनालीला हाय ग्रेड कर्करोग झाला असून, सध्या ती स्लोन कॅटरिंग कॅन्सर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. सोनालीने 2002 मध्ये गोल्डी बेहलशी लग्न केलं असून 2005 मध्ये रणवीरचा जन्म झाला होता.

ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर स्वतःचा एक फोटो शेअर करत म्हटले की, 'जेव्हा तुम्ही बेसावध असता तेव्हाच आयुष्य तुमच्यावर आघात करतं. मला उच्च दर्जाचा कर्करोग झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून मला त्रास होत होता. या त्रासावर उपचार घेण्यासाठी चाचण्या केल्या असता मला कर्करोग झाल्याचे कळले. माझं संपूर्ण कुटूंब आणि मित्र- मैत्रिणी माझ्या पाठिशी आहेत. त्यांनी दिलेल्या पाठिंब्यासाठी मी त्यांचे आभार मानते.'
हेही वाचा: नात्याला काळिमा, आई- बाबा नसताना भावानेच केला 8 वर्षाच्या बहिणीवर बलात्कार
'तात्काळ इलाजांशिवाय कोणताही पर्याय नाही. यापासून पळता येणार नाही. उलट याच्याशी दोन हात करणंच आपल्या हातात आहे. जेवढ्या लवकरात लवकर उपचार सुरू करु तेवढंच चांगलं आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार, सध्या मी न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या काळात जास्तीत जास्त आशावादी राहणं फार महत्त्वाचं आहे. मी प्रत्येक पायरीवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून आप्तेष्टांकडून जो पाठिंबा मिळत आहे त्या प्रत्येकाची मी आभारी आहे. मी या कर्करोगावर विजय मिळवेन, याची मला खात्री आहे. कारण माझे कुटुंब आणि मित्र- मैत्रिणी माझ्या पाठिशी आहेत.'
हेही वाचा: रक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.