News18 Lokmat

...आणि म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर !

अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यामुळे ती सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2018 01:38 PM IST

...आणि म्हणून सोनाली बेंद्रेला झाला हाय ग्रेड कॅन्सर !

मुंबई, 11 जुलै : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचं निदान झाल्यामुळे ती सध्या न्युयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. ती लवकरात लवकर बरी व्हावी यासाठी बॉलिवूडमधील कलाकारांनी तिच्यासाठी प्रार्थना केलीय. मात्र सोनालीवर ही वेळ तिच्याच निष्काळजीपणामुळे आल्याचं स्पष्ट झालं आहे. आपल्याला उद्भवणाऱ्या दुखण्यावर तिने वारंवार दुर्लक्ष केलं आणि आता अशी वेळ आली आहे की ती कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजवर पोहचली आहे.

कॅन्सरच्या लक्षणामुळे गेले काही दिवस तीचं अंग वारंवार दुखत होतं. मात्र तीने त्याकडे कायम दुर्लक्ष केलं. तिच्या याच दुर्लक्षामुळे कॅन्सरने शेवटची स्टेज गाठल्याचं आता स्पष्ट झालं आहे. दरम्यान इतकी आजारी असतानाही तिने अनेक टीव्ही शो केले आणि स्वत:ला कामातच व्यस्त ठेवलं. पण यावर वेळेतच काळजी घेतली असती तर सोनालीला आज हा दिवस बघायला लागला नसता.

दरम्यान, सोनालीचे आजारासंबंधिचे पोस्ट वाचल्यावर अनेकांनाच आश्चर्याचा धक्का बसला. बॉलिवूडमधील कलाकारांपासून ते तिच्या चाहत्यांपर्यंत साऱ्यांनीच तिला लवकराच लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सोनालीनेही तिला शक्य तितक्या ट्विटना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

अजब ! स्लीपर-शॉर्ट्स घातल्यामुळे पुण्याच्या 'या' हॉटेलमधून काढलं बाहेर

सोनालीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचा उपचारांदरम्यानचा एक फोटो आणि एक व्हिडिओ शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिने तिच्या मोठ्या केसांपासून ते लहान केसांपर्यंतचा प्रवास भावनिकपद्धतीने दाखवला आहे. हा फोटो शेअर करताना तिने सर्वांचे आभार मानले आहेत. ज्या व्यक्तींनी त्यांच्या आयुष्याच्या घटना तिच्यासोबत शेअर केल्या त्या सर्वांचे तिने आवर्जुन आभार मानले आहेत.

Loading...

हेही वाचा...

लाखो रुपये कमवण्याचा सोपा उपाय, नोकरी सोडून करा हे काम !

गोव्याचं सरकार 'व्हेंटिलेटर'वर, पर्रीकरांपासून ते आमदारांपर्यंत सगळेच आजारी !

या अटीवर सचिनने पाणीपुरी विकणाऱ्या बॅट्समनला दिली त्याची बॅट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 11, 2018 01:38 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...