मुंबई, 25 मे- सोनाली कुलकर्णी
(Sonalee Kulkarni) ही मनोरंजन सृष्टीतील सर्वात यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचा खास चाहतावर्ग आहे.चाहते सतत तिच्याबद्दल जाणून घ्यायला उत्सुक असतात. सोनालीसुद्धा सोशल मीडियावरुन
(Social Media Post) चाहत्यांना आपल्या दररोजच्या अपडेट्स देत असते. अशातच सोनालीने आपल्या सोशल मीडियावर एक गेल्या आठवड्याचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो फारच खास आहे. पाहूया या फोटोत नेमकं काय आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहतेसुद्धा तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरुन प्रतिसाद देत असतात. नुकतंच सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक सुंदर फोटो शेअर केला आहे. यामध्ये सोनाली निळ्या रंगाच्या पारंपरिक साडीत दिसत आहे. तर तिच्या सासूबाई तिचं औक्षण करताना दिसून येत आहेत. वास्तविक हा फोटो अभिनेत्रींच्या वाढदिवसाचा आहे. गेल्या आठवड्यात सोनालीने आपला वाढदिवस साजरा केला होता.
सोनाली एका सोफ्यावर बसलेली दिसून येत आहे. तिच्या आजूबाजूला सुंदर असं बर्थडे सेलिब्रेशन करण्यात आलं आहे. अभिनेत्रीने फोटो शेअर करत सासरी #बर्थडे सेलिब्रेशन, औक्षण # छाया बेनोडेकर असे टॅग देण्यात आले आहेत. लग्नानंतर सोनालीचा हा पहिला वाढदिवस होता. त्यामुळे अभिनेत्रीच्या सासरीसुद्धा तिचं जंगी सेलिब्रेशन झालं. अभिनेत्रीने हा सुंदर थ्रोबॅक फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

सध्या सोनाली पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. दरम्यान सोनालीने आपले अनेक व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रींच्या बिनधास्त बिकिनी लुकने सर्वांनाच चकित केलं होतं. सोनालीने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला पुन्हा सर्व कुटुंबीय आणि मित्र परिवारासमोर लग्नगाठ बांधली आहे. कारण सोनाली गेल्यावेळी लॉकडाऊनमुळे दुबईत अडकली होती. त्यामुळे अभिनेत्रीने अगदी सध्या पद्धतीने कोर्ट मॅरिज केलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.