सध्या बॉलिवूड असो किंवा मराठी चित्रपटसृष्टी प्रत्येक अभिनेत्रीला फिटनेसचं वेड लागलं आहे. हे कलाकार आपल्याला फिट ठेवण्यासाठी वाटेल ती मेहनत घ्यायला तयार असतात. हे कलाकार तासंतास जिममध्ये घाम गाळत असतात.सतत यांच्या एक्सरसाईजचे फोटो आणि व्हिडीओ आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. नुकताच मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपला एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल देखील होत आहे. यामध्ये सोनाली बॉक्स जम्प मारताना दिसून येत आहे. यामध्ये सोनालीने वेट लॉस जर्नीची सुरुवात आणि रिजल्ट दाखवला आहे. (हे वाचा:मराठमोळ्या रेणुका शहाणेंना इंडस्ट्रीत 34वर्षे पूर्ण; खास VIDEO शेअर करत....) सोनालीने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती एक बॉक्स जम्प घेताना दिसून येते. त्यावेळी ती थोडीशी वेगळी दिसते. त्यानंतर ती जेव्हा दुसरी उडी घेते. तेव्हा तिच्यात मोठा फरक जाणवतो. अर्थातच सोनालीचा हा वेट लॉस आफ्टर आणि बिफोर असा व्हिडीओ आहे. या व्हिडीओमध्ये सोनालीत झालेला बदल अगदी स्पष्ट दिसून येत आहे. सोनालीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे, नऊ महिन्यांच्या मेहनतीनंतर हा रिजल्ट मिळाला आहे. जानेवारीमध्ये सोनालीने वेट लॉस सुरु केलं होत. आज सप्टेंबर म्हणजेच तब्बल नऊ महिन्यानंतर सोनालीने इतका उत्तम फिटनेस मिळवला आहे. हा व्हिडीओ पाहून क्रांती रेडकर, प्रिया बापट ते इतर अनेक अभिनेत्रींनी सोनालीचं कौतुक केलं आहे. चाहत्यांनीही सोनालीच्या या व्हिडीओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (हे वाचा:'कोणाला आहे Filterची गरज?' अभिनेत्री Amruta Khanvilkar ने सांगितलं सौंदर्याचं...) लॉकडाऊनमुळे प्रत्येक कलाकाराकडे स्वतःच्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ उपलब्ध होता. त्यामुळे अनेक कलाकारांनी आणि खासकरून अभिनेत्रींनी योगा आणि इतर व्यायामावर विशेष लक्ष दिलं होतं. मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीनेसुद्धा आपलं फिटनेस फारच मनावर घेतलं होतं. ती दररोज सोशल मीडियावर आपल्या व्यायामाचे व्हिडीओ शेयर करत होती. तसेच महिन्यांपूर्वी सोनालीने आपल्या पतीसोबत एक सुंदर व्हिडीओ शेयर केला होता. त्यामध्ये हे दोघेही व्यायामाचे प्रकार करताना दिसून आले होते.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.