Home /News /entertainment /

Tamasha Live Trailer: 'तमाशा लाईव्ह'चा ट्रेलर प्रदर्शित! समोर आले सिनेमातील नवे चेहरे

Tamasha Live Trailer: 'तमाशा लाईव्ह'चा ट्रेलर प्रदर्शित! समोर आले सिनेमातील नवे चेहरे

तमाशा लाईव्ह या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमात काहीतरी जबरदस्त आणि मनोरंजनात्मक पाहायला मिळेल असं वाटत आहे.

    मुंबई, 04 जुलै:  गेल्या अनेक दिवसांपासून एका सिनेमाची चर्चा आहे तो सिनेमा म्हणजे 'तमाशा लाईव्ह' ( Tamasha Live) सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सिनेमाची उत्सुकता वाढली होती. अशातच आता सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या (Tamasha Live Trailer) भेटीला आला आहे.  सोनाली कुलकर्णी ( sonalee kulkarni) सचित पाटील ( Sachit Patil) यांचा अनोखा अंदाज पाहून सिनेमाविषयी मनात आपसूकच उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलर पाहून सिनेमा जबरदस्त आणि मनोरंजनात्मक असल्याचं  दिसत आहे. 'तमाशा लाईव्ह'मध्ये सोनाली सचितसह सिद्धार्थ जाधव, हेमांगी कवी, पुष्कर जोग, नागेश भोसले, मृणाल देशपांडे, मनमीत पेम, आयुषी भावे अशी तगडी स्टार कास्ट पाहायला मिळणार आहे.  १५ जुलै रोजी हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. 2 मिनीटं 23 सेकंदाच्या ट्रेलरमध्ये सचित पाटील आणि सोनाली कुलकर्णी वृत्तनिवेदकाच्या भूमिकेत आहेत. व्यावसायिक कारकिर्दीत आपण किती वरचढ आहोत, हे दाखवण्यात त्यांची चढाओढ सुरु असून त्यात 'ब्रेकिंग न्यूज'साठीची त्यांची धडपड, एकमेकांबद्दल असलेली ईर्षा यात अधोरेखित होत आहे. आता यातून आणखी काही 'ब्रेकिंग न्यूज' आपल्या समोर येणार का, हे 'तमाशा लाईव्ह' पाहिल्यावरच कळेल. यात सिद्धार्थ आणि हेमांगीही महत्वपूर्ण भूमिकेत दिसत आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारी गाणी कथा पुढे नेणारी आहेत. त्यामुळे या सिनेमात काहीतरी वेगळे पाहायला मिळणार हे नक्की. हेही वाचा - 'डोक्यात काय फॉल्डय काय?' कोल्हापूरकरांसाठी वहिनी सायबांची खास पोस्ट चर्चेत सिनेमाची गाणीही प्रदर्शित झाली असून गाण्यांनाही प्रेक्षकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला आहे. 'तमाशा लाईव्ह'च्या निमित्ताने सोनाली, सचित, सिद्धार्थ यांनी गायकाची भूमिकाही साकारली आहे. आधुनिक विषय असलेला हा एक संगीतमय सिनेमा आणि  प्रत्येक गाण्यात वेगवेगळे प्रयोग करण्यात आले आहेत. सिनेमाला अमितराज व पंकज पडघन यांनी संगीत दिलं आहे. तर गाण्यांचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले आहेत. त्याचप्रमाणे सोनाली, सचित आणि सिद्धार्थ यांच्या धम्माल गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन उमेश जाधव यांनी केलं आहे. एटीएट पिक्चर्स प्रस्तुत, अक्षय बर्दापूरकर निर्मित या सिनेमाचे सहनिर्माते सौम्या विळेकर (प्लॅनेट मराठी, अ व्हिस्टास मीडिया कॅपिटल कंपनी) ( Planet Marathi) माऊली प्रॉडक्शन्स, डॉ. मनीषा किशोर तोलमारे, समीर विष्णू केळकर व अजय वासुदेव उपर्वात असून सिनेमाची कथा मनिष कदम यांची आहे. सिनेमा विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणतात, " यात मी थोडा वेगळा विषय हाताळण्याचा प्रयत्न केलाय. संगीताच्या माध्यमातून हा सिनेमा पुढे जाणारा असून यातील प्रत्येक गाण्यामध्ये एक कथा आहे, जी सिनेमाला पुढे नेते. याचे श्रेय मी संगीत टीमला देईन. कारण यासाठी त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आहे. प्रत्येक सीनला  साजेसे गाणे, संगीत त्यांनी दिले आहे. लोककलेला आधुनिकतेचे स्वरूप देण्यात आलेल्या  'तमाशा लाईव्ह'ची कथा एका अशा वेगळया वळणावर जाणार आहे, ज्याचा शेवट अतिशय रंजक असणार आहे. प्रत्येक कलाकाराने आपली व्यक्तिरेखा उत्कृष्ट सादर केली आहे. आमचा हा प्रयोग प्रेक्षकांना आवडेल, अशी आशा आहे.''
    Published by:Minal Gurav
    First published:

    Tags: Marathi actress, Marathi cinema, Marathi entertainment

    पुढील बातम्या