सोनाली आणि फुलवा यांचे संबंध अप्सरा आली या गाण्यापासून जुळले आहेत. सध्या या दोन अप्सरांना लंडनमध्ये अफलातून नृत्य करताना पाहून फॅन्स सुद्धा त्यांचं कौतुक करताना दिसत आहेत. हे ही वाचा- Tamasha Live Trailer: 'तमाशा लाईव्ह'चा ट्रेलर प्रदर्शित! समोर आले सिनेमातील नवे चेहरे लंडनच्या धर्तीवर मराठी मुलींचा हा कल्ला एकदम पाहणायसारखा आहे. सोनाली आणि फुलावाच्या या कलरफुल प्रमोशनची तुफान चर्चा होताना दिसते आहे. त्यांचे भन्नाट कॉस्च्युमसुद्धा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहेत. फुलवा आणि सोनाली या दोघीनी घेर असलेला रंगीत घागरा परिधान केला आहे. सध्या ‘रंग लागला’ गाण्याचा एक हॅशटॅग भलतंच फेमस होत असल्याचं पाहायला मिळत आहे. इंडस्ट्रीतल्या अनेकांनी या गाण्यावर आपले ठुमके लावले आहात. तसंच अनेक इन्स्टाग्राम influencer सुद्धा सोनालीसमवेत अनेकदा या गाण्यावर थिरकताना दिसले आहेत. संजय जाधव यांची शैली इंडस्ट्रीत बरीच पसंत केली जाते. संजय जाधव यांचा हा ग्रँड म्यूजिकल सिनेमा काय गुपितं उलगडतो हे 15 जुलैलाच पाहावं लागेल.View this post on Instagram
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dance video, Marathi cinema, Marathi entertainment, Sonalee Kulkarni