मुंबई, 29 स्पटेंबर : अप्सरा म्हणून महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni ) सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. सोनाली तिचे सुंदर फोटो तसे काही व्हिडिओ देखील चाहत्यांसोबत शेअर करत असते. नुकतेच सोनालीने तिचे काही फोटो (Sonalee Kulkarni Latest Photo ) सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत सोनाली नेहमीप्रमाणे खूपच सुंदर दिसत आहे. चाहत्यांना देखील तिचा हा लूक (Sonalee Kulkarni Instagram ) आवडलेला आहे. या फोटोला सोनालीने एक हटके कॅप्शन दिली आहे त्याची देखील सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
ट्रेडिशनल आणि डॅशिंग, बिनधास्त अशा अंदाजात सोनाली कुलकर्णी दिसते आहे. तिने नाकात नथ घातली आहे आणि पैठणी साडीचा सूट घातला आहे. आपल्या या हटके लूकसोबत सोनालीने कॅप्शनही हटके दिलं आहे. सोनालीने म्हटले आहे की, ''पुरे झाला आता नथीचा नखरा…आता पाहा माझ्या नथीचा ‘रूबाब’''
View this post on Instagram
सोनालीने म्हटल्याप्रमाणे नक्कीच या लूकमध्ये सोनालीचा रूबाब पाहण्यालायक असाच आहे. पण चाहत्यांना प्रश्न पडला आहे की सोनालीने नेमका हा रूबाब कशासाठी केला आहे. सोनालीच्या नथीच्या रूबाबाचं खास कारण म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा लाडका कॉमेडी शो महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात सोनाली विशेष परीक्षक म्हणून हजेरी लावली. त्यासाठी पैठणी सूट आणि नाकात नथ घालून सोनाली तयार झाली.
हे वाचा - अक्षया देवधरचं 'याड लागलं'; सोशल मीडियावर VIDEO होतोय VIRAL
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतंच तिच्या आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली आहे. 7 मे रोजी सोनालीने कुणाल बेनोडेकरशी लग्नगाठ बांधली. दुबईतील एका मंदिरात अत्यंत साध्या पद्धतीने हा लग्नसोहळा पार पडला.यानंतर सोनाली पती कुणालसोबत मालदिवला गेली होती. यावेळी तिने पतीसोबतचे काही रोमॅंटिक फोटो शेअर केले होते. या फोटोत सोनालीने गुलाबी रंगाची बिकिनी परिधान केली होती. तिच्या या लूकची सोबत तिच्या मंगळसूत्राची देखील त्यावेळी सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sonalee Kulkarni, Tv serial