Home /News /entertainment /

ताराराणींचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर; सोनालीचा तडफदार लूक व्हायरल

ताराराणींचं प्रेरणादायी व्यक्तिमत्व रुपेरी पडद्यावर; सोनालीचा तडफदार लूक व्हायरल

सोनालीनं एक मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

  मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी (Sonalee Kulkarni) एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘छत्रपती ताराराणी’ (Chatrapati Tararani) असं आहे. हा चित्रपट शिवाजी महाराजांची सुन ताराराणी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. सोनालीनं एक मोशन पोस्टर शेअर करत या चित्रपटाची घोषणा केली. तिची ही पोस्ट सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सोनालीनं ताराराणी यांच्यासारखी वेशभूषा धारण केलेला एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोवर तिनं “छत्रपती ताराराणींचं प्रेरणादायी आयुष्य आणि तडफदार व्यक्तिमत्व पडद्यावर आणण्याचं भाग्य लाभणं म्हणजे एका कलाकारासाठी किंबहुना एका मराठी मुलीसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे. पण त्याच बरोबरीने आजवर ज्या रणरागिणी विषयी कुठल्याही चलचित्र माध्यमात फार काही केलं गेलं नाही, तिच्या कर्तुत्वाचे पोवाडे गाणं हे अत्यंत आव्हानातमक काम असेल, या जबाबदारी ची जाणिवही मला आहे. महाराजांचा आशिर्वाद आम्हाला लाभो, आई भवानीने आमच्या मनगटात ही कामगिरी पार पाडण्याचं बळ भरावं बास हीच प्रार्थना.” अशा शब्दात कॉमेंट लिहून या आगामी चित्रपटाची घोषणा केली. हा चित्रपट डॉ. जयसिंगराव पवार लिखित मोगलमर्दानी महाराणी ताराबाई या कादंबरीवर आधारित आहे.
  अवश्य पाहा - दीपिकाची सटकली; शिव्या घालणाऱ्या ट्रोलर्सची केली बोलती बंद कोण होत्या महाराणी ताराबाई? महाराणी ताराबाई या हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. 1683-84 च्या सुमारास ताराबाईंचा विवाह महाराज राजाराम यांच्याशी झाला होता. त्या कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीच्या संस्थापिका होत्या. स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेल्या मोगल सैन्यांनी रायगडास वेढा घातला तेव्हा 5 एप्रिल 1689 रोजी जिंजीला जाण्यासाठी ताराबाईंनी महाराज राजाराम यांच्यासमवेत रायगड किल्ला सोडला. राजाराम जिंजीला गेले, तेव्हा ताराबाई रामचंद्र नीलकंठ यांच्या योजनेप्रमाणे मोगल सैन्याला चुकवीत विशालगड व इतर गडांवर काही वर्षे राहिल्या. त्यानंतर रामचंद्रपंतांच्या सहवासात ताराबाईंनी मुलकी व लष्करी व्यवहाराचे शिक्षण घेतले. ताराबाई, राजसबाई आणि अंबिकाबाई 1694 मध्ये जिंजीला पोहोचल्या. 9 जून 1696 ला ताराबाईंनी जिंजी किल्यावर मुलाला जिन्म दिला. त्याचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 2 मार्च 1700 रोजी महाराज राजाराम यांचा मृत्यू झाला. येथूनच महाराणी ताराबाई यांच्या राजकीय कारकीर्दीची सुरूवात झाली.
  Published by:Mandar Gurav
  First published:

  Tags: Chatrapati tararani, Entertainment, Marathi actress, Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या