अखेर वाढदिवशीच चाहत्यांना सुखद धक्का; सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल सावधान!

अखेर वाढदिवशीच चाहत्यांना सुखद धक्का; सोनाली कुलकर्णीचं शुभमंगल सावधान!

सोनालीने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत आणि चाहत्यांना सुखद धक्काच दिला आहे. सोनाली कुणाल बेनोदेकर याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. मागील वर्षी दुबईत दोघांनीही एकमेकांना प्रेमवचनं देत साखरपुडा केला होता.

  • Share this:

मुंबई, 18 मे : साखरपुड्यानंतर अभिनेत्री सोनाली कुलकर्णी केव्हा एकदा लग्नाची गुड न्यूज देतेय याकडे सर्व चाहत्यांचं लक्ष होतं. अखेर आज तिच्या वाढदिवशी सोनालीने लग्नगाठ बांधली आहे. सोनालीने लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. वर्षभरापूर्वीच सोनालीने साखरपुडा केला होता. त्यानंतर चाहते तिच्या लग्नाच्या बातमीच्या प्रतीक्षेत होते. दुबईमध्ये सोनालीने छोटेखानी स्वरुपात लग्नाचा कार्यक्रम उरकला. कोरोनाचं संकट असताना मोठा कार्यक्रम न करता छोटेखानी स्वरुपात तिचं लग्न पार पडलं. आई-वडील भारतात असल्यामुळे त्यांनीही ऑनलाइन मुलीच्या लग्नात हजेरी लावली.

जुलैमध्ये ती लग्न करणार होती, मात्र कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता तिने ठरलेल्या तारखेच्या आधीच लग्न करायचं ठरवलं. आणि इंग्लंडमध्ये लग्नगाठ बांधली. तिने आपल्या सोशल मीडियावर लिहिलं आहे की, आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.

हे ही वाचा-HBD : सोनाली-कुणालचं शुभमंगल कधी? पाहा सोनालीला कसा भेटला साथीदार

सोनाली कुणाल बेनोदेकर याच्यासोबत लग्नबंधनात अडकली आहे. मागील वर्षी दुबईत दोघांनीही एकमेकांना प्रेमवचनं देत साखरपुडा केला होता. 2 फेब्रुवारी 2020 ला त्यांचा साखरपुडा झाला होता. पण सोनालीने तिच्या वाढदिवशी म्हणजे बरोबर एक वर्षापूर्वी तिच्या साखरपुड्याची बातमी सगळ्यांसोबत शेअर केली होती. सोनाली आणि कुणाल लंडन मध्ये नातेवाईकांच्या कार्यक्रमात भेटले होते. त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले होते. कुणालने सोनालीला आधी प्रपोज केलं होतं. व त्यानंतर सोनालीने त्याला होकार दिला होता. कुणाल हा दुबईत एका मोठ्या हुद्दयावर वित्तीय अधिकारी म्हणून काम करतो. कामाव्यतिरिक्त तो एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसतात.

Published by: Meenal Gangurde
First published: May 18, 2021, 7:26 PM IST

ताज्या बातम्या