Home /News /entertainment /

दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं सासरी बनवला पहिल्यांदा 'हा' गोड पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली...

दुसऱ्यांदा लग्न केल्यानंतर सोनाली कुलकर्णीनं सासरी बनवला पहिल्यांदा 'हा' गोड पदार्थ, फोटो शेअर करत म्हणाली...

सोनाली कुलकर्णीनं सासरच्या मंडळीसाठी लग्नानंतर पहिल्यांदा एक गोड पदार्थ तयार केला आहे. फोटो शेअर करत सोनालीनं याबद्दल माहिती दिली आहे.

  मुंबई, 25 मे- महाराष्ट्राची अप्सरा सोनाली कुलकर्णीच्या  ( Sonalee Kulkarni )  थर्ड हनिमूनची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली आहे. सोनालीनं तिच्या लग्नाच्या वाढदिनी नवरा कुणालसोबत  ( Kunal Benodekar)  दुसऱ्यांदा  परदेशात विधिवत लग्नगाठ बांधली. तिनं वेळ आल्यावर याबद्दल सांगिल असं म्हटलं आहे. आता हळूहळू का होईना सोनाली लग्नानंतरच्या कार्यक्रमांचा आनंद घेत असल्याचे समोर आलं आहे. सध्या ती परदेशात सासरी आहे. सासरच्या मंडळीसाठी लग्नानंतर तिनं पहिल्यांदा एक गोड पदार्थ तयार केला आहे. फोटो शेअर करत सोनालीनं याबद्दल माहिती दिली आहे. सोनाली कुलकर्णी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. मागच्या काही दिवसांपासून ती चाहत्य़ांसोबत हनिमूनचे फोटो शेअर करत आहे. आता ती हनिमूनवरून सासरी परतली आहे. मग काय या नव्या नवरीनं लगेच सासरच्या मंडळीसाठी खास गोडाचा बेत केला आहे. सोनालीनं याची माहिती देत एक फोटो देखील शेअर केला आहे. तिनं म्हटलं आहे की, सासरी केलेला पहिला पदार्थ : तांदळीची खीर 🍚... तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंटचा वर्षाव होत आहे. अनेकांनी तुझ्यासाराखीच खीर देखील गोड असले असं म्हणत सोनालीचं कौतुक केलं आहे. सोनालीनं हा फोटो शेअर करत लेटपोस्ट असं देखील म्हटलं आहे. वाचा-सोनालीने पहिल्यांदाच दाखविली सासरची झलक,अभिनेत्रीसाठी सासूबाईंनी केलं हे खास काम सोनालीने नुकताच पती कुणाल बेनोडेकरसोबत मेक्सिकोमध्ये तिसरा हनिमून साजरा केला. सोनालीने आपले अनेक व्हेकेशन फोटो शेअर केले आहेत. यामध्ये अभिनेत्रींच्या बिनधास्त बिकिनी लुकने सर्वांनाच चकित केलं होतं.
  महाराष्ट्राची अप्सरा अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) हिनं 7 मे 2021 मध्ये कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान कुणाल बेनोडेकरशी ( Kunal Benodekar) परदेशात लग्नगाठ बांधली होती. अत्यंत साधेपणाने घरच्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांनी ही माहिती दिली होती. नुकताच सोनालीनं 7 मेला लंडनमध्ये लग्नाचा पहिला वाढदिवस(first wedding anniversary ) साजरा केला. मात्र नुसता लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला नाही तर तिनं पुन्हा एकदा (Sonalee Kulkarni Wedding in London ) विधीवत लग्न केले आहे. याबद्दल ती लवकरच सांगणार असल्याचे तिनं एका सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं होतं.
  Published by:News18 Trending Desk
  First published:

  Tags: Entertainment, Marathi entertainment, Sonalee Kulkarni

  पुढील बातम्या