'आपला मानूस'च्या हिंदी रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा

'आपला मानूस'च्या हिंदी रिमेकमध्ये सोनाक्षी सिन्हा

मराठीत गाजलेला नाना पाटेकरचा 'आपला मानूस' या सिनेमाचा हिंदीत रिमेक येणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करणार आहे.

  • Share this:

28 मे : मराठीत गाजलेला नाना पाटेकरचा 'आपला मानूस' या सिनेमाचा हिंदीत रिमेक येणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. या हिंदी सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारीकर करणार आहे.

यातील सुनेच्या भूमिकेसाठी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी करिना कपूरला पहिली पसंती दिली होती. मात्र आता या भूमिकेसाठी सोनाक्षी सिन्हाचं नाव निश्चित झाल्याची चर्चा आहे. सोनाक्षीला या सिनेमाचं कथानक एवढं आवडलं की तिने स्वतः आशुतोष यांना भेटून या सिनेमात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. आता करिनाच्या जागी सोनाक्षी सिन्हा असेल.

विवेक बेळेंच्या काटकोन त्रिकोण नाटकावर आपला मानूस सिनेमा होता. त्याचं दिग्दर्शन सतीश राजवाडेंनी केलं होतं. आता नाना पाटेकरच्या जागी हिंदीत कोण, की खुद्द नानाच ही उत्सुकता आहे.

 

First published: May 28, 2018, 4:24 PM IST

ताज्या बातम्या