'सोनाक्षी तुझे संस्कार कुठे गेले?' ट्रान्सपरंट गाऊनमुळे सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोल

'सोनाक्षी तुझे संस्कार कुठे गेले?' ट्रान्सपरंट गाऊनमुळे सोनाक्षी सोशल मीडियावर ट्रोल

या फोटोमध्ये सोनाक्षी लाल रंगाच्या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये दिसतेय. तिचा हा फोटो पाहुन युजर्सनी सोनाक्षीला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये.

  • Share this:

13 एप्रिल : बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाने नुकतंच तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंवरुन तिचा एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. सोनाक्षीला हा फोटो पोस्ट करणं चांगलंच महागात पडलं आहे.

या फोटोमध्ये सोनाक्षी लाल रंगाच्या ट्रान्सपरंट गाऊनमध्ये दिसतेय. तिचा हा फोटो पाहुन युजर्सनी सोनाक्षीला ट्रोल करण्यास सुरुवात केलीये.

'सोनाक्षी तुझे संस्कार कुठे गेले?' असा प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावरुन सोनाक्षीला विचारला आहे. तर काहींनी 'तु फारच विचित्र दिसतेस' अशा कमेंट देखील केल्या आहेत.

First published: April 13, 2018, 10:17 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading