शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप सोडण्यावर मुलगी सोनाक्षीने दिली ही प्रतिक्रिया

शत्रुघ्न सिन्हा यांच्या भाजप सोडण्यावर मुलगी सोनाक्षीने दिली ही प्रतिक्रिया

बाबा सुरुवातीपासूनच भाजपशी जोडले गेले होते. अटलजी, आडवाणी यांच्यापासून ते या पक्षाशी जोडले गेले होते.

  • Share this:

मुंबई, ३१ मार्च- बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने वडील आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचं समर्थन केलं आहे. सोनाक्षीने स्पष्टपणे सांगितलं की, बाबांनी फार आधीच भाजप पक्ष सोडायला हवा होता. एएनआयने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटतं की त्यांना हे फार आधीच करायला हवं होतं. त्यांना पक्षात तो सन्मान मिळत नव्हता जो मिळणं त्यांचा हक्क आहे. ही त्यांचा आवडीची गोष्ट आहे. जर तुम्ही स्वतः आनंदी किंवा समाधानी नसाल तर तुम्हाला बदल घडवावा लागतो. त्यांनीही नेमकी हेच केलं.’

सोनाक्षी पुढे म्हणाली की, ‘बाबा सुरुवातीपासूनच भाजपशी जोडले गेले होते. अटलजी, आडवाणी यांच्यापासून ते या पक्षाशी जोडले गेले होते. पण पक्षाने त्यांना योग्य तो मान दिला नाही. मला वाटतं हा निर्णय घेण्यात त्यांनी उशीर केला. हे फार आधीच केलं पाहिजे होतं.’


भारतीय जनता पक्षाशी शत्रुघ्न सिन्हा अनेक वर्षांपासून जोडले गेले होते. मात्र आता त्यांनी काँग्रेस पक्षातून आगामी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना भेटल्यानंतर ‘शॉटगन’ म्हणाले की, नवरात्रीत शुभ दिवस असतो. त्यामुळे ते चांगल्या कामाची सुरुवात ६ एप्रिलपासून अर्थात गुढीपाडव्यापासून करणार आहेत. याबद्दल बोलताना सोनाक्षी म्हणाली की, ‘मला वाटतं की काँग्रेस पक्षात गेल्यावर बाबा अजून चांगलं काम करतील आणि विनाकारण त्यांच्यावर दबावही राहणार नाही.’

मलायका - अर्जुनच्या नात्यावर काय म्हणाला अरबाज?


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 31, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या