विराट कोहलीबाबत सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य, सलमाननेही दिली साथ

विराट कोहलीबाबत सोनाक्षी सिन्हाचं मोठं वक्तव्य, सलमाननेही दिली साथ

सोनाक्षी सिन्हा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीबद्दल असं काय म्हणाली की तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

मुंबई, 14 डिसेंबर : सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान सध्या त्यांचा बहुचर्चित सिनेमा ‘दबंग 3’च्या प्रमोशनमध्ये बीझी आहे. या सिनेमाचं प्रमोशन करताना सलमाननं कोणतीच कसर सोडलेली नाही. या प्रमोशनसाठी सलमान आणि सोनाक्षी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये हजेरी लावणार आहेत. पण त्यापूर्वी सोनाक्षी सिन्हा भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीबद्दल असं काय म्हणाली की तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

सोनाक्षी सिन्हा आणि सलमान खान 15 डिसेंबरला होणाऱ्या भारत-वेस्टइंडीज सामन्याच्या वेळी त्यांचा सिनेमा ‘दबंग 3’च्या प्रमोशनसाठी स्टार स्पोर्ट्सच्या स्टुडिओमध्ये जाणार आहेत. त्यापूर्वी स्टार स्पोर्ट्सच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात सोनाक्षी सिन्हा विराट कोहलीबद्दल बोलतान दिसत आहे.

जयंती विशेष : दिग्दर्शकाची एक थप्पड आणि बदललं राज कपूर यांचं आयुष्य!

या व्हिडीओमध्ये सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा एकमेकांची खिल्ली उडवताना दिसत आहेत. यावेळी सोनाक्षी सलमानला सांगते, पांडे जी मी विचार करत होते की आपण एकदा स्टार स्पोर्ट्सचा स्टुडिओ फिरून येऊ. यावर सलमान म्हणतो, तिथं आपलं काय काम? त्यावर सोनाक्षी म्हणते, पांडे जी तो विराट आहे ना... असं ऐकलंय की तो सुद्धा दबंग आहे... अगदी तुमच्यासारखा... आजकाल बॉलर्सची चांगलीच धुलाई करत आहे... म्हणून मी विचार केला स्टुडिओमध्ये बसून मॅचची मजा घेऊ. यावर सलमान सुद्धा तिला सहमती दर्शवतो.

फिटनेससाठी रोज सूर्योदयाआधी उठतो बाॅलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार

सलमान सोनाक्षीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. सलमान आणि सोनाक्षीच्या प्रमुख भूमिका असलेला ‘दबंग 3’ येत्या 20 डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन साउथ सुपरस्टार प्रभूदेवानं केलं असून महेश मांजरेकर यांची मुलगी सई मांजरेकर या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे.

TANHAJI चित्रपटातील एका दृश्यावर आक्षेप, प्रदर्शनाआधी वंशजांना दाखवा अशी मागणी

Published by: Megha Jethe
First published: December 14, 2019, 1:05 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading