VIDEO : मुंबईच्या ट्राफिकमध्ये सोनाक्षीची बुलेट राइड, युजर्स म्हणाले...

VIDEO : मुंबईच्या ट्राफिकमध्ये सोनाक्षीची बुलेट राइड, युजर्स म्हणाले...

सोनाक्षी मुंबईच्या ट्राफिकमध्ये रॉयल इनफिल्ड चालवत करिना कपूरच्या व्हॉट विमेन वॉन्ट या शोमध्ये पोहचली.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हानं नुकतीच करिना कपूरचा रेडिओ शो ‘व्हॉट विमेन वॉन्ट’मध्ये हजेरी लावली होती. पण या शोच्या सेटवर ती ज्या पद्धतीनं पोहोचली त्यामुळे ती सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. सोनाक्षी या शोसाठी मुंबईच्या ट्राफिकमध्ये रॉयल इनफिल्ड चालवत पोहचली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आणि त्यामुळेच तिला ट्रोलिंगचा सामनाही करावा लागला. सोनाक्षीचा या बाइक राइडला काहींनी पब्लिसिटी स्टंट आणि शो ऑफ म्हटलं आहे.

करिना कपूरचा शो व्हॉट विमेन वॉन्टसाठी बाइक चालवत सोनाक्षी शोच्या सेटवर पोहोचली. पण रस्त्यात तिनं सर्वांचं लक्ष स्वतःकडे वेधून घेतलं. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तिच्या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, सोनाक्षी रॉयल इनफिल्ड चालवताना दिसत आहे. पण मुंबईच्या ट्राफिकमध्ये तिला फोटोग्राफर्सनी घेरलं आहे. याशिवाय तिचे बॉडीगार्ड सुद्धा रस्त्यावर तिच्यासोबत चालले आहेत. जे इतर वाहनांना सोनाक्षी पासून दूर ठेवत आहेत.

रिव्हिलिंग ड्रेसमुळे प्रियांका झाली ट्रोल, आई मधू चोप्रां टीकाकारांना म्हटलं...

मुंबईच्या बीझी रोडवर सोनाक्षीची बाइक राइडवाला अंदाज तिच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. काही युजर्सनी तिला दबंग गर्ल तर काहींनी बुलेट राणी सारखी नावं दिली आहेत. तर काहींनी सोनाक्षीला प्रेरणास्रोत देखील म्हटलं आहे. पण तिचा असं करणं काहींना मात्र अजिबात आवडलेलं नाही. त्यामुळे सोशल मीडिया युजर्सनी सोनाक्षीला ट्रोल केलं आहे.

व्हिडीओ कॉलवर होती दीपिका, को-स्टारनं रणवीर सिंहला केलं KISS

सोनाक्षीच्या या कृतीचं एकीकडे कौतुक होत असताना दुसरीकडे तिच्यावर टीकाही करण्यात आली. एका युजरनं लिहिलं, तुझं बाइक रायडींग स्किल तुझ्या अभिनयापेक्षा चांगलं आहे. दुसऱ्या एका युजरनं लिहिलं, पायी चालणाऱ्या बॉडीगार्डसोबत रस्त्यावर बाइक चालवणं हा काय विनोद आहे. तर आणखी एका युजरनं हा फक्त पब्लिसिटी स्टंट असल्याचं सांगत, तुला माहित आहे का अशा प्रकारे ट्राफिकमध्ये बाइक चालवल्यानं लोकांना याचा किती त्रास झाला आहे. अशी कमेंट केली आहे.

दिव्यांकाची ओढणी बिग बींनी पकडली... पाहा VIDEO

First published: February 1, 2020, 11:52 AM IST

ताज्या बातम्या