सोनाक्षी सिन्हा करत होती स्टार अभिनेत्याला डेट, आता बॉयफ्रेंडबद्दल म्हणते...

सोनाक्षीच्या रिलेशनशिप स्टेटसविषयी फारसं कोणाला माहित नाही आणि ती सुद्धा या विषयावर बोलणं नेहमीच टाळताना दिसते.

News18 Lokmat | Updated On: Jul 20, 2019 12:37 PM IST

सोनाक्षी सिन्हा करत होती स्टार अभिनेत्याला डेट, आता बॉयफ्रेंडबद्दल म्हणते...

मुंबई, 20 जुलै : अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आपल्या खासगी आयुष्याविषयी खूप कमी वेळा बोलते. तिच्या रिलेशनशिप स्टेटस विषयी सुद्धा फारसं कोणाला काही माहित नाही. सोनाक्षीच्या 9 वर्षांच्या सिने करिअरमध्ये तिच नावं अद्याप कोणत्याही सहकलाकाराशी जोडलं गेलेलं नाही. पण नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतील सोनाक्षीनं काही वर्षांपूर्वी ती एका स्टार बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट करत होती पण ते नातं फार काळ टिकू शकलं नाही असा खुलासा केला आणि यातील खास गोष्ट अशी की, सोनाक्षीच्या या अफेअरबाबत कोणालाच समजलंही नव्हतं. सोनाक्षीच्या या खुलाश्यानंतर मात्र सर्वच अवाक झाले आहेत.

वयाच्या साठीत तरुण हिरोईनबरोबर दिले होते बोल्ड सीन

'आयएनएएस'नं दिलेल्या वृत्तानुसार एका मुलाखतीत सोनाक्षी तिच्या खासगी आयुष्याविषयी मनमोकळेपणे बोलली. याचवेळी तिनं तिच्या रिलेशनशिप बद्दलही सांगितलं. सोनाक्षी म्हणाली, ‘माझ्या आई-बाबांना वाटतं की, मी एका सुशील मुलाशी लग्न करावं आणि बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असं कोणीही नाही. माझ्या भूतकाळात मी एका स्टार बॉलिवूड सेलिब्रिटीला डेट केलं होतं आणि याबद्दल कोणाला काहीच समजलं नाही.’ पण यावेळी सोनाक्षीनं या अभिनेत्याचं नाव घेणं मात्र टाळलं.

मलायकाचा तिरस्कार करतो अरबाज खान? घटस्फोटानंतर असं आहे दोघांमधील नातं

Loading...

सोनाक्षी तिचं नातं सर्वांसमोर उघड करत नसली तरीही तिला नात्यात विश्वासघात करणं अजिबात मान्य नाही. तुझा बॉयफ्रेंड तुझ्याशी चीटिंग करत असेल तर तु काय करशील? त्यावर ती म्हणाली, 'तो पुढचा दिवस पाहण्यासाठी जिवंत राहणार नाही.' यावरून ती रिलेशनशिपच्या बाबतीत खूपच शिस्तबद्ध आणि गंभीर असल्यांच दिसून येतं. काही दिवसांपूर्वी सोनाक्षी बंटी सजदेहला डेट करत असल्याचं बोललं जात होतं. यावर सोनाक्षीला विचारल्यावर तिनं या सर्व अफवा असल्याचं सांगत, 'जेव्हा मी लग्न करेन तेव्हा सर्वांना सांगेन. ही गोष्ट सर्वांपासून लपवण्यासारखी अजिबात नाही.'

अभिनेता श्रेयस तळपदेनं दिला The Lion King साठी आवाज, हे आहे ‘गोड’ कारण

सोनाक्षी पुढे म्हणाली, मी सध्या माझ्या कामात खूप बीझी आहे. त्यामुळे मी लग्नाचा विचार अद्याप केलेला नाही. पण मला समजत नाही लोक अशा अफवा कशा पसरवतात. आगामी सिनेमाबद्दल बोलायचं तर सोनाक्षी लवकरच खानदानी शफाखानामध्ये दिसणार आहे. या सिनमात तिच्यासोबत रॅप सिंगर बादशाह आणि वरुण शर्मा दिसणार आहेत. हा सिनेमा येत्या 2 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याशिवाय ती सलमान खान सोबत दबंग 3 मध्येही दिसणार आहे.

=======================================================================

SPECIAL REPORT: मॉबलिंचिंगने बिहार हादरलं; चोरीच्या संशयातून तिघांची निर्घृण हत्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 20, 2019 12:37 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...