मुंबई, 29 डिसेंबर: बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) नुकतीच मालदीवमध्ये सुट्ट्या एन्जॉय करुन घरी परतली आहे. मालदिव व्हेकेशनचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. तिच्या बोल्ड फोटोंना चाहत्यांची बरीच पसंती मिळाली होती. आता सोनाक्षीने एक भन्नाट व्हिडीओ शेअर केला आहे.
सोनाक्षीचा व्हिडीओ व्हायरल
सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर शेअर केलेला अंडरवॉटर सफरीचा व्हिडीओ तुफान हिट झाला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाक्षी सिन्हा एका बोटीतून समुद्रामध्ये उडी मारताना दिसत आहे. समुद्राखालच्या जगाचा अनुभव सोनाक्षीने घेतला आहे. एका दिवसात या व्हिडीओला 1 लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आहेत.
View this post on Instagram
मालदीवमधील व्हेकेशन संपल्याची माहिती सोनाक्षीने स्वत: आपल्या चाहत्यांना दिली आहे. सोनाक्षीने शेअर केलेल्या व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे, ‘पाण्यामध्ये मला सर्वात जास्त आनंद मिळतो’ असं तिने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे. मालदीव सध्या बॉलिवूड सेलिब्रिटींचं सर्वात आवडतं डेस्टिनेशन आहे. तापसी पन्नू, काजल अग्रवाल यासारख्या अभिनेत्रीदेखील काही दिवसांपूर्वीच मालदीवला जाऊन आल्या आहेत.