News18 Lokmat

काय करतेय सोनाक्षी सिन्हा 'दबंग 3'मध्ये?

या सिनेमाचं शूटिंग पुढच्या वर्षापासून होणार आहे. या दबंग-3 मध्ये एक नाही तर दोन अभिनेत्री झळकणार असल्याचं सोनाक्षीने सांगितलं आहे.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Nov 6, 2017 12:27 PM IST

काय करतेय सोनाक्षी सिन्हा 'दबंग 3'मध्ये?

06 नोव्हेंबर : दबंग खान सलमानचा दबंग सिनेमाचा तिसरा भाग लवकरच आपल्या सगळ्यांच्या भेटीला येणार आहे. पण यात सोनाक्षी सिन्हा नसल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर जोर होता. सोनाक्षीने सगळ्यांच्या शंकेचे निरसन करत तिच्या दबंग सिनेमाबद्दलच्या भूमिकेचा खुलासा केला आहे. ती दबंग-3 मध्ये असल्याचं तिने सांगितलं आहे.

या सिनेमाचं शूटिंग पुढच्या वर्षापासून होणार आहे. या दबंग-3 मध्ये एक नाही तर दोन अभिनेत्री झळकणार असल्याचं सोनाक्षीने सांगितलं आहे.

या आधीही सलमान खानने एका मुलाखतीत दबंग सिनेमाच्या तिसऱ्या भागाबद्दल सांगितलं होतं. त्यात तो असं म्हणाला होता की, 'दबंग - 3 मध्ये फ्लॅशबॅक सीन असणार आहेत. चुलबुल पांडेचा रॉबिनहूड पांडे कसा झाला हे सांगणारा हा सिनेमा असणार आहे.'

सोनाक्षी सिन्हा फक्त दबंग-3 मध्येच नाही तर 'हॅप्पी भाग जायेगी' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये असणार आहे. त्याचबरोबर तिचा 'इत्तेफाक' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे सोनाक्षी पुरती व्यस्त आहे असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 6, 2017 12:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...