…म्हणून सोनाक्षी सिन्हाने तिच्या घरी फ्रेम करून ठेवलाय 3 हजारांचा चेक

…म्हणून सोनाक्षी सिन्हाने तिच्या घरी फ्रेम करून ठेवलाय 3 हजारांचा चेक

मी सुरुवातीला लॅक्मे फॅशन वीकमध्ये काम करायची. बॅकग्राउंडला लोकांची बसायची जागा कोणती आहे हे सांगायचं काम करायची.

  • Share this:

मुंबई, 04 ऑगस्ट- पहिला कमाई ही प्रत्येकासाठी खास असते. मग ते सेलिब्रिटी असो किंवा सर्वसामान्य माणूस, प्रत्येकालाच आपला पहिला पगार कायम लक्षात राहतो. पहिल्या पगारातून आपण खास व्यक्तिंसाठी काही विकत घेतो तर कधी सेविंग करतो. पण काहीही केलं तरी पहिला पगार कधीच विसरता येत नाही. मात्र सोनाक्षी सिन्हाने आपली पहिली कमाई नेहमीच अविस्मरणीय रहावी यासाठी एक वेगळी शक्कल लढवली.

सोनाक्षीने तिच्या पहिल्या कमाईचा चेक फ्रेम करून घरी लावला. सोनाक्षीची पहिली कमाई 3 हडार रुपये होती. याबद्दल सोनाक्षीला विचारले असता ती म्हणाली की, ‘हो हे खरंय की माझ्या आईने 3 हजार रुपयांचा चेक फ्रेम करून घरी लावला आहे. ती माझी पहिली कमाई होती म्हणून आईने तसं केलं.’

सोनाक्षी पुढे म्हणाली की, ‘मी सुरुवातीला लॅक्मे फॅशन वीकमध्ये काम करायची. बॅकग्राउंडला लोकांची बसायची जागा कोणती आहे हे सांगायचं काम करायची. पाच दिवस हे काम करायचे मला 3 हजार रुपये मिळाले होते. तेव्हाच मला सलमान खान भेटला. तो मला म्हणाला होता की, तो मला सिनेमात घेण्याचं म्हणाला. त्याचबरोबर त्याने मला वजन कमी करण्यावर लक्ष द्यायलाही सांगितलं.’

सोनाक्षी सिन्हाने याबद्दल द कपिल शर्मा शोवर खुलासा केला. सोनाक्षीची ही गोष्ट ऐकून कपिल मस्करीत म्हणाला की, ‘फ्रेम करण्याआधी ते चेक वटवायचा तरी होतास.’

या बॉलिवूड अभिनेत्याने ‘जंगला’त केलं न्यूड फोटोशूट, ज्वाला गुट्टाने बंद केले डोळ

पावसाचा फटका मालिकांनाही, रात्रीस खेळ चाले मालिकेचं चित्रीकरण थांबलं

मानसिक आजाराने त्रस्त गोविंदा? जवळच्या मित्राने केला खुलासा

काजोलपासून जेनेलियापर्यंतच्या 5 आई, ज्यांनी मुलांसाठी करिअर सोडलं..

VIDEO: मालाडमध्ये घरात गुडघ्याभर पाणी, नागरिकांचे हाल

Published by: Madhura Nerurkar
First published: August 4, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading