सोनाक्षी सिन्हानं चोरला मलायका अरोराचा ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

सोनाक्षी सिन्हानं चोरला मलायका अरोराचा ड्रेस, सोशल मीडियावर PHOTO VIRAL

बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये नेहमीच फॅशनेबल आणि ग्लॅमसर दिसण्यासाठी चढाओढ सुरू असते पण त्यामुळेच काही अभिनेत्रींना ट्रोल व्हावं लागतं.

  • Share this:

मुंबई, 24 ऑक्टोबर : बॉलिवूड अभिनेत्रींमध्ये नेहमीच फॅशनेबल आणि ग्लॅमसर दिसण्यासाठी चढाओढ सुरू असते. तर चाहत्यांचंही त्यांच्या आवडत्या सेलिब्रेंटीकडे बारीक लक्ष असतं. अगदी कोणत्या इव्हेंटमध्ये कोणता ड्रेस घातला होता इथंपासून ते कोणी कोणाची कॉपी केली. या सगळ्याबाबत चाहते प्रचंड जागरुक असल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळेच मग काही अभिनेत्री ट्रोल होतात. असंच काहीसं झालंय बॉलिवूडची दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हा सोबत. सोनाक्षी सध्या मलायका अरोराची कॉपी केल्याच्या कारणानं ट्रोल होत आहे.

सोशल मीडियावर मलायका आणि सोनाक्षीचे काही कोलाज फोटो खूप व्हायरल होत आहेत. ज्यात या दोघींनी एक सारखाच ड्रेस घातलेला दिसत आहे. काही दिवसांपूर्वी 10 व्या वौग ब्यूटी अवॉर्डमध्ये मलायकानं डीप नेक व्हाइट ड्रेस घातला होता. ज्यामुळे तिनं या फंक्शनमध्ये सर्वांचं लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं.

‘मारेंगे भी हम, बचाएंगे भी हम’, जबरदस्त अॅक्शनवाला सलमानचा चुलबुल पांडे अवतार

नुकतेच सोनाक्षीनं तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. तिचे हे फोटो पाहिल्यावर चाहत्यांना मलायकाची आठवण झाली कारण सोनाक्षीनं मलायकाचा ड्रेस कॉपी केला होता. पण असं असतानाही ती या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

सोनाक्षी आणि मलायकाच्या ड्रेसमध्ये काही प्रमाणात फरक आहे. सोनाक्षीनं मलायकाप्रमाणं हॉट पोझ दिलेल्या नाहीत. एकीकडे मलायकानं डार्क रेड लिपस्टिक लावली होती तर दुसरीकडे सोनाक्षीनं न्यूड कलरला प्राधान्य दिलं. काही मीडिया रिपोर्टनुसार या दोघींचेही ड्रेस एकाच डिझायनरनं डिझाइन केल्याचं बोललं जात आहे. या डिझायनरचं नाव Kristian Aadnevik असं सांगितलं जात आहे.

KBC 11: बायकोला मंगळसूत्र घेऊन देण्यासाठी तो पोहोचला हॉट सीटवर आणि....

सोनाक्षीनं तिच्या इन्स्टाग्रामवर या ड्रेसमधील फोटो शेअर केल्यानंतर युजर्सनी मात्र हा ड्रेस मलायकाच्या वोग लुकची कॉपी असल्याचं लगेचच ओळखलं आणि त्यांनी सोनाक्षीला ट्रोल करायला सुरुवात केली. सोनाक्षीनं मलायकाचा ड्रेस चोरल्याचं काही जणांनी म्हटलं आहे. मलायकानं वोग अवॉर्डला घातलेल्या ड्रेस सारखा हा ड्रेस सोनाक्षीनं एका क्लोदिंग ब्रँडच्या इव्हेंटमध्ये घातला होता.

जेव्हा जान्हवी तिच्या ड्रेसवरून प्राइज टॅग काढायला विसरते!

===========================================================

SPECIAL REPORT : पुण्यात 'या' ठिकाणी मिळतोय स्वस्तात मस्त लाडू आणि चिवडा!

Published by: Megha Jethe
First published: October 24, 2019, 6:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading