सोनाक्षीला अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, 'दबंग'साठी सलमाननं ठेवली होती ही अट

सोनाक्षीला अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री, 'दबंग'साठी सलमाननं ठेवली होती ही अट

सोनाक्षी सिन्हाला सलमानच्या 'दबंग'मध्ये एंट्री तर मिळाली पण सिनेमा साइन करताना त्यानं मागितलेली एक गोष्ट मात्र तिला देता आली नाही.

  • Share this:

मुंबई, 2 जून : सोनाक्षी सिन्हाचा आज 33 वा वाढदिवस. सोनाक्षीला बॉलिवूडमध्ये जवळपास 10 वर्ष झाली आहेत. तिनं 2010 मध्ये तिचा पहिला सिनेमा दबंग रिलीज झाला मात्र हा सिनेमा साइन करण्याआधी बॉलिवूडमध्ये पदार्पण करावं की नाही यावर सोनाक्षीचा निर्णय होतं नव्हता. कारण तिच्या आई-वडीलांना त्यांच्या काळात अनेक सुपरहिट सिनेमा दिले होते आणि त्यावेळी तिचे वडील राजकारणावर लक्ष केंद्रित करत होते. त्याचवेळी सोनाक्षीचं वजन एवढं वाढलेलं होतं की, तिला आपल्या सिनेमात काम देणं कोणत्याही कास्टिंग डायरेक्टर किंवा डायरेक्टरला शक्य नव्हतं.

अशी मिळाली बॉलिवूडमध्ये एंट्री

जेव्हा सोनाक्षी तिच्या करिअरबद्दल काळजीत होती. त्यावेळी सलमान खाननं पहिल्यांदा तिच्यावर विश्वास दाखवला. सलमाननं तिला बोलावून घेतलं आणि तिला सांगितलं की, तुला मी माझ्या आगामी सिनेमात घेईन मात्र त्यासाठी तुला तुझं हे वजन कमी करावं लागेल. त्यावेळी सोनाक्षी खाण्याची शौकीन होती. अशात खाणं कमी करणं तिच्यासाठी खूप कठीण गेलं.

बडा धमाका! एकताविरोधात हिंदुस्तानी भाऊची पोलिसात तक्रार; वाचा काय आहे प्रकरण

View this post on Instagram

Borrrrrrrrrrrrrrrrrred. Whats everyone doing to keep themselves busy/happy/entertained/sane??? Asking for a friend.

A post shared by Sonakshi Sinha (@aslisona) on

सलमान खाननं दाखवलेला विश्वास आणि त्याची अट यानंतर सोनाक्षीनं दिवस-रात्र मेहनत करायला सुरुवात केली. स्वतःचं वजन कमी करण्यावर तिनं खूप मेहनत घेतली. काही महिन्यांनंतर जेव्हा ती सलमानला भेटली त्यावेळी त्यानं तिला दबंगसाठी कास्ट केलं. पण त्याचवेळी त्यानं तिच्याकडे आणखी एक मागणी केली होती.

सलमाननं केली ही मागणी

सलमान खाननं सोनाक्षीला दबंग सिनेमात काम देण्याच्या बदल्यात तिच्याकडे ट्रीट मागितली. सोनाक्षी सांगते, तो दिवस असा होता जेव्हा माझ्याकडे पैसे नव्हते. सलमाननं जेव्हा माझ्याकडे ट्रीट मागितली त्यावेळी माझ्या पर्समधून मला केवळ 3 हजार रुपये मिळाले. पण एवढ्याशा पैशात ट्रीट देणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यावेळी मी त्याचं बोलणं टाळलं. पण नंतर हळूहळू वेळ निघून गेली. आम्ही दोघंही आमच्या कामात बीझी झालो. पण मला या गोष्टीची आजही खंत आहे की, मी सलमानला अद्याप ट्रीट दिलेली नाही.

'या' अभिनेत्रीच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटुंबाला व्हायरसची लागण

'माझ्यासाठी प्रार्थना करा, लवकरच भेटू' वाजिद यांचा शेवटचा फोन कॉल Viral

First published: June 2, 2020, 11:43 AM IST

ताज्या बातम्या