का सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' ?

का सोडतेय सोनाक्षी 'नच बलिए' ?

काही दिवस तरी सोनाक्षीला 'नच बलिए 8'चे एपिसोड्स जज करता येणार नाही. तिच्या जागी येतेय मलाईका अरोरा.

  • Share this:

26 एप्रिल : सोनाक्षी सिन्हा सध्या 'नच बलिए 8'ची खुर्ची सोडायची तयारी करतेय.  ती इतकी बिझी झालीय की तिला 'नच बलिए'साठी वेळ देणं कठीण जातंय.

काही दिवस तरी सोनाक्षीला 'नच बलिए 8'चे एपिसोड्स जज करता येणार नाही. तिच्या जागी येतेय मलाईका अरोरा.

मलाईका आणि अरबाज एकमेकांपासून वेगळे झाल्यानंतर पहिल्यांदाच ती डान्स रिअॅलिटी शो जज करतेय. त्याआधी तिनं झलक दिखला जा आणि इंडियाज गाॅट टॅलेंट या शोमध्ये परीक्षकाचं काम केलंय.

मलाईकासाठी नच बलिएचं स्टेज नवीन नाही. तिनं सिझन 1 आणि 2 जज केलाय. सध्या मलाईका नच बलिएचं शूट करतेय. सोनाक्षी तिच्या प्रोफशनल टुरवर आहे. ती आॅकलंडमध्ये आहे. तोपर्यंत तरी ही कमान मलाईकाच सांभाळणार.

First Published: Apr 26, 2017 05:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading