सुफी गाण्याच्या व्हिडिओवरून सोना मोहापात्राला मदारिया फाऊन्डेशनची धमकी

सुफी गाण्याच्या व्हिडिओवरून सोना मोहापात्राला मदारिया फाऊन्डेशनची धमकी

सोनाचा 'तोरी सुरत' हा म्युझिक व्हिडिओ हटवण्याचा इशारा मदारिया सुफी फाऊण्डेशनने मेल करुन दिला आहे

  • Share this:

मुंबई :  प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राला धमकी देण्यात आली आहे. मदारिया सुफी फाऊण्डेशने सोनाच्या  एका गाण्यावर आक्षेप घेत धमकी दिली आहे.

सोनाचा 'तोरी सुरत' हा म्युझिक व्हिडिओ हटवण्याचा इशारा मदारिया सुफी फाऊण्डेशनने मेल करुन दिला आहे. तोरी सुरत हे एक मध्ययुगीन सुफी गीत असून  हे गाणं प्रसिद्ध कवी  आमिर खुसराव यांनी लिहिलं होतं . या गाण्यास सेन्सॉरने मान्यता देखील  दिली आहे.

'तोरी सुरत' हे गाणं अश्लील असल्याचा दावा मदारिया सुफी फाऊण्डेशनने केल्याचं सोनाने सांगितलं. त्यामुळे धार्मिक तणाव निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत मदारिया सुफी फाऊण्डेशनने धमकी दिल्याचा आरोप सोनाने केला आहे. जेव्हा की यात काहीच अश्लील नाही असं सोनाचं म्हणणं आहे .

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 1, 2018 11:52 AM IST

ताज्या बातम्या